बिग बॉस 19ला दोन आठवडे झाले आहेत. या शोमध्ये आता अनेक सदस्यांचे खरे रूप समोर येत आहे. अनेक सदस्य यावेळी स्वत:च्या आयुष्याबाबत अनेक बाबी उघड करताना दिसत आहेत. आता घरात सतत चर्चेत असलेली सदस्य तान्या मित्तलने तिच्या आयुष्या संदर्भात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. प्रत्येक नॉमिनेशन टास्कनंतर तान्या भावनिक होऊन रडू लागते. (Latets Entertainment News)
सगळ्यात आधी तिला मित्र प्रणीत मोरेने नॉमिनेट केले. यानंतर कुनीका सदानंदने तिला एका टास्क दरम्यान आईने दिलेल्या संस्कारांवरून सुनावले तेव्हा तिला रडू कोसळले. यानंतर तान्याने तिच्या घरच्या परिस्थितीबाबत सगळ्यांना अवगत केले आहे. तिने यावेळी सांगितले की कसे तिचे वडील तिला सतत मारहाण करायचे.
तान्या मित्तलने वडिलांचे सत्य सांगितले. यावेळी ती म्हणते, ‘ माझे वडील मला मारायचे. यावेळी आई मला वाचवायची. मला बिझनेस सुरू करताना अनेक अडचणी आल्या. साडी नेसणे असेल आणि घराबाहेर पडणे यासाठीही मला सतत परवानगी घ्यावी लागायची.
मला सतत लग्न केले जाण्याची भीती होती. मी 19 वर्षांची होते. तेव्हा माझे लग्न होणार होते. त्यावेळी मरुन जावे असे वाटत होते. पण आई त्यावेळी माझ्या मदतीला आली. माझ्या वाईट वेळेत आई माझ्या पाठीशी सतत उभी होती. तिनेच मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिली.
तान्याच्या या खुलाशाने घरातील अनेक सदस्य भावनिक झाले आहेत. यावेळी अनेकांनी कुनिकाला तिच्या शब्दासाठी सुनावले. यानंतर तान्याने पुन्हा सांगितले की तिच्या वडिलांना तिला इंजिनीअर बनवायचे होते. पण दोन वर्षातच तिने कॉलेज सोडून दिले आणि घरी परत आली.
यानंतर वडिलांनी तिला सहा महिन्यांचा अवधि दिला होता. कारण सहा महीने तिने स्वयंपाक शिकावा त्यानंतर तिचे लग्न लावण्यात येइल असे त्यांनी तिला सांगितले होते. पण हे सहा महीने तिने स्वत: उभे करण्यात खर्च केले.