

बिग बॉस 19च्या घरात सध्या एकाच व्यक्तीने सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले आहे. आपले आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आहे असे सांगत असतानाच तिच्या स्टेटमेंट्सनी मात्र प्रत्येकजण आवाक झाला आहे. मागच्या आठवड्यात तिला अनेकांनी ट्रोल केले होते. वीकएंडला सलमाननेही तान्याला बऱ्याच कोपरखळ्या मारल्या होत्या. (Latest Entertainment News)
तसेच तान्याचा एक्स बॉयफ्रेंड बलराज सिंग यानेही तान्या फेक व्यक्ती असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली होती. पण या सगळ्या धामधुमीत तान्याच्या घरच्यांचे निवेदन व्हायरल होत आहे. तिच्या घरातल्यांनी एक निवेदन सोशल मिडियावर जारी केले आहे.
या निवेदनात तिच्या घरचे म्हणतात, ‘देशातील सगळ्यात मोठा रिअलिटी शो मध्ये आमची लेक तान्याला पाहून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. तिच्या लोकांचे मन जिंकण्याने आम्हाला आमचा गौरव झाल्यासारखे वाटत आहे. पण दुसरीकडे तिचा सतत अपमान होताना पाहून, तिला सतत टारगेट केले जाते हे पाहून दुख पोहोचते आहे. प्लीज कुटुंबाला या ट्रोलिंगपासून लांब ठेवा. आमचे तुम्हाला निवेदन आहे की तिचा प्रवास पूर्ण होईपर्यंत कोणतीही टीका किंवा निर्णय घेऊ नका. एवढे तिच्यासाठी केले जाऊच शकते.
तुमचे रील्स किंवा आरोप भलेही तुम्हाला प्रसिद्धी देतील पण आमच्या कुटुंबाला मोठी जखम ठरू शकते. त्यामुळे आम्ही विनंती करतो की आम्हाला म्हणजेच तान्याच्या कुटुंबाला ट्रोलिंगपासून लांब ठेवा.’ पुढे ते म्हणतात, ‘हा आमच्यासाठी कठीण काळ आहे. आम्ही आमच्या लेकीला खूप प्रेमाने वाढवले आहे. कधी वाटले नव्हते इतकी नेगेटिव्हिटी सहन करावी लागेल. प्रत्येक कठोर शब्द आम्हाला किती यातना देतो हे शब्दापलिकडे आहे. आमची हीच इच्छा आहे की माणुसकी कायम राहो. ती जोपर्यंत घरात आहे आम्ही पाठीशी उभे आहोत. तान्या आम्हाला तुझा अभिमान आहे. अगदी तशीच मजबूत रहा जशी बॉस आम्ही तुला बनवले आहे.’