

कंटेंट क्रिएटर आणि अॅक्टर अपूर्वा माखीजाने तिचा भारत दौरा जाहीर केला आहे. रेबेल किड म्हणून ओळख असलेली अपूर्वाने रविवारी ही घोषणा केली.
तिच्या या पोस्टनंतर नेटीझन्सना प्रश्न पडला आहे. अपूर्वा या स्टेजवर नक्की परफॉर्म काय करणार? या पोस्टमध्ये लिहिले आहे. ‘रेबेल आणि तिचे मित्र पूर्ण उर्जेने तुमच्या शहरात येत आहेत. अपूर्वा उर्फ रेबेल किड एक राष्ट्रव्यापी टेकओव्हर टूरवर जात आहे. भारत आता वेळ आहे, जोश दाखवण्याचा'. ती यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये टूरवर जाणार आहे. (latest Entertainment News)
अपूर्वाने सोशल मीडियावर टूरची पोस्ट शेयर करताच नेटीझन्सनी नेहमीप्रमाणे हटके आणि अतरंगी कमेंट्स केल्या आहेत. एकजण म्हणतो, ‘ सगळ्यात वाईट गोष्ट ही की लोक खरोखरीच जातील.’ तर दुसऱ्याने उल्लेख केला आहे की 'ही टूरमध्ये काय करणार आहे?’
तर दुसरी कमेंट अशी होती की ती स्टेजवर जाऊन काय करणार? गप्पा मारणार? तर एकाने 'आतापर्यंतची सगळ्यात वेगळी घोषणा' अशी कमेंट केली आहे.
‘या शो वर पैसे का खर्च करायचे?’ असे एका नेटीझन्सचे मत होते. तर दुसऱ्याने म्हटले आहे की मी तिचा फॅन आहे तरीही पैसे खर्च करून हिला बघायला जाणार नाही. अर्थातच अपूर्वा स्टेज शो का करते आहे हाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाच अपूर्वा इतर कंटेंट क्रिएटरसोबत इंडियाज गॉट लेटेंटच्या एक एपिसोडमध्ये दिसली होती. हा एपिसोड बराच वादात सापडला होता. कारण यात पालकांच्या वैयक्तिक क्षणांबाबत जास्त चर्चा केल्याने या शोवर टीकेची झोड उठली होती.
यानंतर अपूर्वा पुन्हा चर्चेत आली ती माजी बॉयफ्रेंडने केलेल्या आरोपामुळे. अपूर्वाने स्वत:ची इमेज चांगली करण्यासाठी त्याच्यावर खोटे आरोप केल्याचे समोर आले होते.