

बिग बॉस 19च्या घरात रोज एक नवीन ड्रामा घडताना दिसतो आहे. सोमवारी मात्र या घरात असे काही घडले की सदस्यही अवाक झाले. घरात आपल्या सुशील आणि संस्कारी इमेजसाठी तान्या मित्तल कायमच अतोनात प्रयत्न करत असते. पण आता असे काही घडले आहे की तिच्या या इमेजवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (Latest Entertainment News)
सलमान होस्ट करत असलेल्या घरात तान्याने आध्यात्मिक व्यक्ती अशी इमेज निर्माण केली आहे. पण घरातील वादविवादादरम्यान तिने चक्क अभिषेक बजाजला शिवीगाळ केली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तान्या अभिषेकला माफी मागण्यास सांगते.
पण अभिषेक घरात अॅटीट्यूड दाखवतो आणि माफी मागणार नाही असे सूनवतो. यानंतर ती म्हणते, ‘अबे अबे....अशनूर कम से कम सॉरी तो फील कर रही है और तू ***** आकर सीधा गले मिलना चाहता है' हे ऐकताच अभिषेक तिच्यावर भडकतो. ‘****** क्या होता है. गाली किसको दे रही है . यावरून अभिषेक आणि तान्याची चांगलीच जुंपते. अर्थात व्हीडियोमध्ये या दोघांच्या आवाजातील शिव्या म्युट केल्या आहेत.
अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांनी माइक न बोलताना दिसतात. त्यामुळे बिग बॉस त्यांच्यावर भडकले आहेत. घरातील एका टास्क दरम्यान घरातल्यांना अशी पॉवर मिळते की ते अशनूर अभिषेकला एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करतात. पण गौरव खन्नामुळे हा टास्क रद्द होतो. परिणामी, या आठवड्यात संपूर्ण घर नॉमिनेट झाले. या कारणामुळे घरात मोठा गोंधळ उडाला.