टेलिव्हिजनचे स्टार जोडी जय भानुशाली आणि माही वीज वेगळे झाल्याचे समोर येत आहे. इतके दिवस या जोडीत काही आलबेल नाही हे समोर येत होते. पण आता काही सूत्रांनुसार ही जोडी वेगळी झाली आहे. इतकेच नव्हे तर बराच काळ हे दोघे एकमेकांपासून वेगळे रहात आहेत. या बातमीने दोघांचेही फॅन्स कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. गेली 15 वर्षे हे दोघे लग्नाच्या नात्यात होते. (Latest Entertainment News)
जेव्हा या दोघांच्या नात्यात सगळे काही ठीक नसल्याचे समोर आले होते. त्याच वेळी हे दोघेही नाते पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होते. पण या सर्वांचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी या जोडीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
याच वर्षी या दोघांनी कोर्टात घटस्फोटाचे पेपर्स दाखल केले होते. जय आणि माहीचा घटस्फोट जुलै किंवा ऑगस्ट महिन्यातच झाला आहे.
या जोडीला एक बायोलॉजिकल मुलगी आहे. जिचे नाव तारा आहे. याशिवाय त्यांनी ताराच्या जन्माआधी दोन मुलांना दत्तक घेतले आहे. या दोघांच्या घटस्फोटानंतर तारा आणि इतर दोन मुलांच्या कस्टडीबाबतही निर्णय झाला आहे.
एकमेकांवर विश्वास नसणे हे या दोघांच्या घटस्फोटाचे कारण मानले जात आहे.
जय आणि माही यांच्याकडुन घटस्फोटासंदर्भात कोणतेही ऑफीशियल स्टेटमेंट समोर आलेले नाही.
या संदर्भात माहीला विचारले असता तिने उत्तर दिले होते, ‘ मी तुम्हाला का सांगू? तुम्ही माझे नातेवाईक आहात का?
लग्नही गुपचुप केले होते
2011 मध्ये माही आणि जय गुपचुप लग्न केले होते. 2019 मध्ये ही जोडी आई - वडील बनले.