Jhalak Dikhhla Jaa : ‘झलक दिखला जा’मध्ये तनिशा मुखर्जीचा ‘लैला मै लैला’वर जबरदस्त डान्स

tanisha
tanisha

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhhla Jaa) सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 11 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. 'FAM' म्हणजे फराह खान, अर्शद वारसी आणि मलाइका अरोरा हे तिघे आपली डान्सची आवड शेअर करायला आणि स्पर्धकांना मार्गदर्शन करायला एकत्र येत आहेत. दरम्यान, अभिनेत्री तनिशा मुखर्जीने आपला कोरिओग्राफर जोडीदार तरुण निहलानीसोबत 'लैला मै लैला' गाण्यावर जबरदस्त डान्स करून सगळ्यांना थक्क केले. (Jhalak Dikhhla Jaa)

संबंधित बातम्या –

तनिशाचा परफॉर्मन्स पाहून अवाक झालेली फराह खान म्हणाली, "मी तनिशाला फॉलो करते आणि मी तिचा कारकीर्दीचा आलेख पाहिला आहे. ती काही डान्सर नाही. मला वाटते, तुम्हाला जर योग्य कोरिओग्राफर मिळाला, तर तुम्ही चांगला डान्स करू शकता."

तनिशा मुखर्जी फराह खानची चाहती आहे आणि फराहला आपल्या बहिणींना नृत्यदिग्दर्शन करताना तिने पाहिले आहे. तनिशा म्हणाली, फराह मॅम, मी तुम्हाला काजोल आणि राणीला नृत्य-दिग्दर्शन करताना बघितले आहे. जेव्हा मला समजले की, 'झलक दिखला जा' मध्ये तुम्ही एक परीक्षक असणार आहात, तेव्हा मला खूप भीती वाटली. मला माहीत आहे की फराह खान परखडपणे बोलते आणि पक्षपात न करता ती नक्की माझ्यावर टीका करेल. फराह, तुम्ही मला ओळखता. मी काही डान्सर नाही. काजोल लहानपणी थोडे फार कथ्थक शिकली होती. पण मी कधीच डान्सचे धडे घेतले नाहीत.

चित्रपटात मी फक्त छोटे छोटे शॉट दिले आहेत. सलग अडीच मिनिटांचा परफॉर्मन्स देखील दिलेला नाही. जेव्हा या टीमने मला सांगितले की हा वन टेक परफॉर्मन्स असेल आणि मला संपूर्ण अडीच मिनिटांचा परफॉर्मन्स करायचा आहे, तेव्हा मी खूप घाबरले की हा परफॉर्मन्स मी बिनचूक कसा करू शकेन? जेव्हा मी इतरांना पाहिले, तेव्हा ते सगळे फारच छान नाचत होते. मी बसल्या-बसल्या विचार करत होते की, कुणीच चुका करत नव्हते आणि आपल्या स्टेप विसरत नव्हते.

तनीषा म्हणते, तालमीच्या वेळेस मी कोणती ना कोणती स्टेप हमखास विसरायचे. मला 'गजनी'सारखे वाटत होते. तुम्ही म्हणालात, त्याप्रमाणे या शोमध्ये सगळे स्टार्स आहेत. खरं सांगायचं तर, मी काही स्टार नाही. मी इतक्या मोठ्या स्तराची सेलिब्रिटी नाही. तुम्ही जेव्हा म्हणालात की, मी एखाद्या स्टारसारखी परफॉर्म करत होते, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणीच आले! मी इतकेच म्हणेन की, तुमचे कुटुंब आणि मित्रमंडळी स्टार असणे ही खूप मोठी गोष्ट असते. ते सोपे नसते. त्याबद्दल धन्यवाद; आज मात्र मला स्टार असल्यासारखे वाटते आहे."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news