‘सलमान सोसायटी’ यादिवशीला भेटीला, उपेंद्र लिमये ख़ास भूमिकेत | पुढारी

'सलमान सोसायटी' यादिवशीला भेटीला, उपेंद्र लिमये ख़ास भूमिकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘सलमान सोसायटी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये खास भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील दुसरे सॉन्ग आधीच लॉन्च करण्यात आले आहे. अभ्यासू कीडा असे या गाण्याचे बोल असून उपेंद्र लिमये, विनायक पोतदार आणि नितीन एम यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले. ‘सलमान सोसायटी’ चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत केली आहे.

संबंधित बातम्या – 

अवंतिका दत्तात्रय पाटील आणि विडियो पॅलेस प्रस्तुत ‘सलमान सोसायटी’ हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. ‘अभ्यासू कीडा’ हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले आहे आणि गायक सुहास सावंतने गायले आहे. अमित बाईंग ने कोरियोग्राफ केले आहे तसेच चित्रपटाचे डीओपी फारुक खान आहेत.

दिग्दर्शक कैलाश पवार म्हणतात “हे गाणे खूपच एंटरटेनिंग असून प्रत्येक शाळेत वाजेल अशी अपेक्षा आहे. उपेंद्र लिमयेने खूपच सुंदर परफॉर्म केले आहे, त्यामुळे हे गाणे आणखी सुंदर होते. गाण्याची कोरिओग्राफी उत्तम झालेली आहे आणि म्युझिकदेखील दमदार आहे. खूप काळानंतर बच्चे कंपनी हे गाणं एन्जॉय तर करतील. पण, पालकांच्यादेखील हे गाणे पसंतीस उतरेल.

या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. बाल कलाकार पुष्करने या आधी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘बाजी’, ‘रांजण’, ‘चि .व चि .सौ. का’, ‘फिरकी’ आणि ‘टी. टी. एम. एम’ झोंबीवली चित्रपटात अभिनय केला आहे तर शुभम मोरेने हिंदी चित्रपट ‘रईस’मध्ये बालपणीच्या शाहरुख़ खानची भूमिका बजावली. तसेच ‘हाफ टिकिट’, ‘फास्टर फेणे’ जर्नी सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने ‘हाफ टिकिट’, ‘ताजमहल’ आणि ‘येरे येरे पावसा, माउली’मध्ये भूमिका केल्या आहेत.

चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पाहुण्या भूमिकेत आहे. तसेच देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

प्रजक्ता एंटरप्राइजेस निर्मित , अवंतिका दत्तात्रय पाटील आणि व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत सलमान सोसायटी १७ नोव्हेंबर २०२३ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून म्युझिक व्हिडिओ पॅलेसवर उपलब्ध आहे.

Back to top button