Marathi OTT : ‘पथम वालवू’ मल्याळम चित्रपट मराठी ओटीटीवर पाहता येणार | पुढारी

Marathi OTT : 'पथम वालवू' मल्याळम चित्रपट मराठी ओटीटीवर पाहता येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका मागोमाग एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक एम. पद्मकुमार यांच्या ‘पथम वालवू’ या सुपरहिट चित्रपटाचा १३ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. (Marathi OTT) चित्रपटात मल्याळम चित्रपटसृष्टीतले कौशल्यवान अभिनेते इंद्रजित सुकुमारन आणि सूरज वेंजारामूडू यांनी कमालीचा अभिनय सादर केला आहे. (Marathi OTT)

संबंधित बातम्या –

ड्युटी पूर्ण करून एस.आय सेथू आपल्या गर्भवती बायकोला दवाखान्यात बघायला जात असताना त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून खून केलेल्या दोषीला पकडण्याची जबाबदारी येते. त्या खुनीचा मागोवा घेत सेथूला सोलोमन या व्यक्तीची माहिती मिळते. सोलोमनचा हृदय पिळवटून टाकणारा भूतकाळ ऐकून सेथूही भावनिक होतो. असा काय असेल भूतकाळ? हे चित्रपटात कळणार आहे.

 

Back to top button