

Tamannaah Bhatia Dating Virat Kohli
मुंबई- बॉलीवुड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचा एक जुना फोटो सध्या चर्चेत आहे. हा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या की, दोघांनी एकमेकांना डेट केल आहे. आता अखेर तमन्नाने या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. तिने स्पष्ट केलं आहे की, या वृत्तांमध्ये काहीही तथ्य नाही.
एका मुलाखतीत तमन्ना भाटियाला व्हायरल झालेल्या फोटोबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली की, विराट कोहली सोबत एका जाहिरातीसाठी शूट करण्यात आलं होतं. आणि ती म्हणाली, फक्त त्याचवेळी एक दिवस मी त्याला भेटले. आणि त्यानंतर कधी त्याला भेटले नाही. न त्याच्याशी बोलले. तमन्ना म्हणाली, “मला खरंच खूप वाईट वाटतं. कारण मी एकच दिवस त्याला भेटले होते.”
तमन्नाने सांगितलं की, एका फोटोच्या आधारावर अफवा पसरवणे चुकीचे आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीशी काहीही संबंध नसतो. तेव्हा अशा प्रकारच्या अफवा त्रासदायक ठरतात. सेलिब्रिटीच्या नात्याने अशा अफवांमुळे खासगी जीवनावर परिणाम होतो. प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवणे कठीण होते. तमन्ना म्हणाली की, लोक जे विचार करतात, ते बोलतात. तुम्हा सर्वांना समजवू शकत नाही की, सत्य काय आहे.