

Mahavatar Narsimha Movie
नवी दिल्ली : 'महावतार नरसिंह' चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी गुवाहाटीमध्ये दुर्घटना झाली. थिएटरमध्ये चित्रपट सुरु असताना अचानक छत कोसळले. यावेळी मुलांसह तीन लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
'महावतार नरसिंह'ची बॉक्स ऑफिसवर खूप चर्चा आहे. चित्रपटाने १० दिवस पूर्ण केले असून दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केले आहे. ॲनिमेशन 'महावतार नरसिंह' चे स्क्रीनिंग गुवाहाटीतील एका थिएटरमध्ये सुरु होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली. याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.
या घटनेनंतर थिएटरच्या मालकाशी प्रेक्षकांचा वाद झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत कोसळल्या प्रकरणी आता थिएटर प्रशासनाकडून कुठलेही अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही.
'महावतार नरसिंह' लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणार आहे. एकीकडे 'सैयारा'चा धुमाकूळ दुसरीकडे या चित्रपटाकडे प्रेक्षकांचा कल दिसतो आहे. रविवारी २३.४ कोटी रुपयांचे कलेक्शन चित्रपटाने केले आहे. आतापर्यंत ९१.६५ कोटी रु. कमावले आहेत.
'महावतार नरसिंह' एक ॲनिमेटिड चित्रपट आहे. २५ जुलैला हा चित्रपट रिलीज झाला होता. ‘महावतार नरसिंह’ आयएमडीबी (IMDb) वर भारतात सर्वाधिक रेटिंग मिळवणारा चित्रपट बनला आहे. त्याला ९.६ रेटिंग मिळाली आहे.