

Farhan Akhtar film 120 Bahadur new poster released
मुंबई - अभिनेता फरहान अख्तरच्या नव्या चित्रपटाचे दमदार पोस्टर रिलीज झाले आहे. १२० बहादूर असे चित्रपटाचे नाव असून त्याने इन्स्टाग्राम अकाऊंवर हा फोटो शेअर केला आहे. मेजर शैतान सिंग भाटी यांच्या भूमिकेत फरहान असणार आहे. शूर अधिकाऱ्याच्या भूमिकेत फरहान आपल्या कष्टाची, प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. उद्या या चित्रपटाचा टीझर रिलीज होणार असल्याची माहिती समोर येणार आहे.
अभिनेत्री राशी खन्नाने चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे, 'हम पिछे नही हटेंगे.' द साबरमती रिपोर्ट आणि योद्धा या चित्रपटांमध्ये राशीने विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे १२० बहादूरमध्ये ती साकारत असलेले पात्र योग्य ठरणार आहे.
१२० बहादूर हा चित्रपट भारत-चीन युद्धादरम्यान रेझांग ला येथील लढाईभोवती फिरतो. फरहान मेजर शैतान सिंग यांच्या भूमिकेत असेल. देशासाठी लढताना बलिदानाबद्दल परमवीर चक्राने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
१९२४ मध्ये राजस्थानात जन्मलेले मेजर शैतान सिंह PVC, 13 कुमाऊं रेजिमेंटच्या चार्ली कंपनीचे कमांडिंग अधिकारी होते. १८ नोव्हेंबर, १९६२ रोजी लडाखच्या बर्फाच्छादित 'रेजांग ला' वर त्यांनी आणि त्यांच्या तुकडीच्या ११९ जवानांनी चीनी हल्ल्याचा निर्भिडपणे सामना केला होता.
हा चित्रपट २१ नोव्हेंबर, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. १२० बहादूर चित्रपट रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि अमित चंद्राने एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅप्पी स्टुडिओजच्या बॅनर अंतर्गत निर्मिती करण्यात आलीय. चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश 'रेजी' घई यांनी केलं आहे. कहाणी, स्क्रीनप्ले राजीव जी. मेनन यांनी लिहिले आहेत. संवाद सुमित अरोरा यांचे आहेत. तर संगीत अमित त्रिवेदी यांनी दिले आहे. जावेद अख्तर यांनी गाणी लिहिली आहे.