Lust Stories 2 : लस्ट स्टोरीज 2 मध्ये विजय वर्मा-तमन्ना भाटियाची जबरदस्त केमेस्ट्री

Lust Stories 2
Lust Stories 2

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या एका पाठोपाठ एक प्रोजेक्ट करताना बघायला मिळतेय. तिच्या शेवटच्या रिलीज झालेल्या, जी करदा ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आणि पुन्हा ती "लस्ट स्टोरीज 2" मधून चर्चेत आली आहे. तमन्नाने तिच्या उत्कृष्ट कामगिरीने पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आणि सोशल मीडियावर याची चर्चा देखील होत आहेत. नेटिझन्सने नेटफ्लिक्स आलेल्या या सीरिजमध्ये विजय वर्मासोबतच तिची तिच्या केमिस्ट्री अनुभवली आणि त्याच कौतुक केलं. (Lust Stories 2)

नेटफ्लिक्सवर लस्ट स्टोरीज 2 आल्यानंतर तमन्ना भाटिया ट्विटरवर ट्रेंड करू लागली. चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अभिनेत्रीचे कौतुक होत असल्याने, तिच्या चाहत्यांच्या काय म्हटलं आहे पाहुया !

एका चाहत्याने लिहिले, "#LustStories2OnNetflix @MrVijayVarma @NetflixIndia मध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची अविश्वसनीय केमिस्ट्री पाहून खूप आनंद झाला."

दुसर्‍या ट्विट मध्ये एक चाहता म्हणतो " खूप चांगली कामगिरी केली असून लोकांना तिचं काम खूप आवडतंय. #LustStories2OnNetflix"

तमन्ना आणि विजयच्या ऑनस्क्रीन जोडीचे कौतुक करताना एका फॅनने म्हटलं आहे- "तमन्ना आणि विजय यांनी एकमेकांचे खूप चांगले कौतुक केले आहे. एक जोडी म्हणून त्यांनी खूप चांगले काम केले #LustStories2OnNetflix @tamannaahspeaks".

लस्ट स्टोरीज 2 नंतर तमन्ना मल्याळममध्ये बांद्रा, तेलुगुमध्ये भोला शंकर आणि तमिळमध्ये जेलरच्या रिलीजसाठी सज्ज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news