Cannes : सनी लिओनी रेड कार्पेटवर स्टाईलिस्ट अंदाज दाखवण्यासाठी सज्ज

Sunny Leone सनी लिओनी
Sunny Leone सनी लिओनी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनीचे २०२३ हे वर्ष अनेक गोष्टींसाठी खास आहे. सनीचा वाढदिवस नुकताच पार पडला आणि तिने तो तिच्या जवळच्या व्यक्तीसोबत साजरा केला. सनीने (Cannes) गेल्या काही वर्षांत तिच्या आकर्षक आणि स्टायलिश पोशाखांनी तिच्या चाहत्यांना आणि फॅशन समीक्षकांना या फॅशन गेममुळे चकित केले आहे. फॅशन आयकॉन सनी तिचा फॅशन गेम दाखवण्यासाठी आणि कान्स २०२३ मध्ये रेड कार्पेटवर आपल्या फॅशनची जादू दाखवण्यासाठी खूप उत्साहित आहे. (Cannes)

ती लवकरच तिच्या टीमसोबत २०२३ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये केनेडी चित्रपटाद्वारे पदार्पण करण्यासाठी सज्ज असल्याचे समजते. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत तिचा हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे. या मर्डर मेलडीचा टीझर नुकताच रिलीज झाला आणि चाहत्यांना सनी लिओनीच्या अनोख्या अभिनयाचं कौतुक केलं.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news