फुलाला सुगंध मातीचा फेम आकाश पाटील अडकला विवाह बंधनात | पुढारी

फुलाला सुगंध मातीचा फेम आकाश पाटील अडकला विवाह बंधनात

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुलाला सुगंध मातीचा मालिकेत तुषारची भूमिका साकारणार आकाश पाटील विवाह बंधनात अडकला. आकाशचे लग्नातील काही फोटोज व्हायरल झाले आहेत. याआधी त्याने साखरपुडा आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

आकाशने याआधी टकाटक या चित्रपटातही काम केले होते. अभिनेत्री ऐश्वर्या शेटे, समृद्धी केळकर या अभिनेत्रींनी आकाशच्या लग्नाला उपस्थिती लावली. यावेळी फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील कलाकार आकाशच्या लग्नाला आले होते. आकाशने या मालिकेत तुषार ही भूमिका साकारली होती. तो शुभमच्या लहान भावाच्या भूमिके होता. त्यात त्याने इमेलीच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती.

फुलाला सुगंध मातीचा आकाश पाटील
फुलाला सुगंध मातीचा आकाश पाटील

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit J Mane (@amitmane0305)

Back to top button