

सनीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याबाबत मत एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले
सनीने कोणतीही एक बाजू निवडण्यापेक्षा मध्यम मार्ग निवडायला आवडेल हे सांगितले
सनी आता एका हॉलीवूड प्रोजेक्टमध्येही झळकणार आहे
Sunny Leone: सनी लिओनी सध्या बॉलीवुडच्या लाईम लाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सतत अॅक्टिव असते. सुरुवातीला सिनेमे आणि आयटम सॉन्ग्स यातून ओळख बनवलेली सनी आता उत्तम कलाकार आहे. (Latest Entertainemt News)
एका मुलाखतीदरम्यान तिला राजकारणासंदर्भात काही प्रश्न विचारले गेले. तिला यावेळी डोनाल्ड ट्रंप कसे वाटतात याबाबत विचारले गेले. याला उत्तर देताना सनी म्हणते, 'हा अत्यंत अवघड प्रश्न आहे. मी कोविड दरम्यान कॅलिफोर्निया येथे होते. तिथे वातावरण ट्रंपविरोधी होते.
आम्ही मित्र मैत्रिणी भेटायचो किंवा काही हाऊस पार्टी व्हायची तेव्हा आम्ही राजकारण या विषयावर बोलायला बंदी घातली होती. कारण राजकारण हा विषय सुरू झाला की दोन गट पडतात. पण आता काळ असा आहे की मधला कोणता मार्गच शिल्लक नाहीये. एकतर तुम्ही त्यांचे समर्थक असता किंवा त्यांचे विरोधक. मी या प्रश्नाचे उत्तर वेगळ्या पद्धतीने देऊ इच्छिते. मला असे वाटते की आपण त्या काळात परत जावे जिथे आपण आपल्या नेत्यांवर प्रेम करायचो.
ट्रंप यांच्याबाबत काही गोष्टी मला आवडतात. आणि काही गोष्टीबाबत मी जिथे विचार करते अरे देवा बास! आता आणखी जास्त बोलू नका.’ ट्रंप यांच्यामुळे अर्थव्यवस्थेत बदल होतील का? तर हो. पण त्याची किंमत काय असेल? या सगळ्या वर्षांत काय बदल होतील?
जे काही घडत आहे त्यात काही गोष्टी अगदी गरजेच्या आहेत तर काही अजिबातच नाहीत. मी त्यात माध्यम मार्ग निवडलेल्या व्यक्तीसारखी होऊ इच्छिते की आम्ही त्या नेत्यावर प्रेम करू ज्याला आम्ही निवडले आहे.’
सनी सध्या कोणत्याही बॉलीवुड प्रोजेक्टमध्ये दिसून येत नाहीये. पण तेलुगू सिनेमात ती दिसून येते. या शिवाय स्प्लिट्सव्हिला या रिअलिटी शोची होस्ट म्हणून ही सनी दिसते आहे. तसेच तीने अलीकडेच एका हॉलीवुड सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच हॉलीवूड सिनेमात दिसणार आहे. याशिवाय नेटफ्लिक्सच्या एका प्रोजेक्टमध्येही ती दिसणार असल्याचे समोर येत आहे.