Entertainment News
Namrata sambheraopudhari

Namrata Sambherao: सहकाऱ्यांसाठी अभिनेत्री नम्रता संभेराव बनली शेफ; बनवले चक्क ढाब्यावर जेवण

प्रयोगाहून परतताना या टीमला जेवण कुठेही मिळाले नाही
Published on

Actress Namrata Sambherao: एखाद्या नाटक, सिनेमा आणि मालिकेत काम करणारे कलाकार अनेकदा कालांतराने एकमेकांचे मित्र बनतात. त्यांच्या ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना आवडते. असेच काहीसे आहे नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर या जोडीचे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून आपल्यासमोर आलेल्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. 'थेट तुमच्या घरातून' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नाटकाचा प्रयोग नुकताच कोल्हापूर येथे पार पडला. त्यानंतर ही टीम सांगली येथे गेली होती. पण प्रयोगाहून परतताना या टीमला जेवण कुठेही मिळाले नाही. (Latest Entertainment News)

अशा वेळी खुद्द नम्रता संभेरावने एका ढाब्याच्या ठिकाणी जाऊन स्वत: जेवण बनवले. यावर बोलताना प्रसाद खांडेकरने नम्रताचा स्वयंपाक बनवतानाचा एक व्हीडियो शेयर केला आहे. 'अन्नपूर्णा नम्रता' असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे. पुढे तो म्हणतो, ‘सांगली ला प्रयोगाला जाताना शॉपिंग मुळे थोडा उशीर झाला आणि जेवणाचे वांदे झाले .... जवळ जवळ सगळ्या हॉटेल्स मधील शेफ लंच टाईम होऊन गेल्यामुळे निघून गेलेले शेवटी एका ढाब्यावर मालकाची परमिशन घेऊन आमच्या नमा ने थेट किचन चा ताबा घेतला'. यावर नम्रताने 'yeew माझे आवडते काम' म्हणत या पोस्टवर रीप्लाय दिला आहे. अर्थात या दोघांच्या संवादावर नेटीझन्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

एकजण म्हणतो, ‘असं करू नका प्रोडक्शनचे लोक गृहीत धरतील. नेहमी तुम्हालाच करायला लागेल.’ तर दूसरा म्हणतो, 'लॉली इन किचन ! डोन्ट क्लीकड, डोन्ट फ्लॅशड !’. तर एकाने काहीशी खोचक कमेंट केली आहे 'त्या बाहेर दोघी ज्या मोबाईल घेऊन बसल्या आहेत त्यांनी आणि बाकीच्या टीम ने नामाला मदत करायला हवी ती सगळ्यांसाठीच बनवत आहे ना बिचारी'. तर एकाने थेट प्रश्न केला आहे, हॉटेल चालू केलं का चांगले आहे काही तरी वेगळा व्यवसाय असाल पाहिजे.

Entertainment News
Kapil Sharma: आता ऐकले नाही तर... ! लॉरेन्स बिश्नोईच्या हल्ल्यानंतर कपिल शर्माला पोलिस संरक्षण

थेट तुमच्या घरातून या नाटकातून प्रसाद खांडेकर, भाग्यश्री मिलिंद, ओंकार राऊत,भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news