Summary:
क्यों की सास भी कभी बहू थी 2 ने मालिकेच्या विश्वात नवा विक्रम रचला आहे
एका आठवड्यात टीआरपीमध्ये अनुपमाला टाकले मागे
लॉंचनंतर मिळाले 1.69बिलियन मिनिट व्ह्यूज
एकता कपूरच्या क्यों की सास भी कभी बहू थी 2 ने पदर्पणातच लंबी रेस का घोडा असल्याचे सिद्ध केले आहे. शो लॉंच झाल्यानंतर 1.6 कोटी इतके मिनिट व्यूज मिळाले आहेत. एका आठवड्यातच टीआरपीमध्ये नंबर वन होण्याचा मान या मालिकेने मिळवला आहे. (Latest Entertainment News)
ही मालिका 29 जुलैला टेलिव्हिजनवर प्रसारित झाली होती. जेव्हा या मालिकेची घोषणा झाल्यापासून ती टीआरपीमध्ये सगळ्यांना वरचढ होणार असल्याची शक्यता तेव्हाच वर्तवली जात होती. अर्थात रिलीजनंतर ही शक्यता मालिकेने खरीही ठरवली होती.
क्यों की.. आल्यावर अनुपमाच्या टीआरपीवर परिणाम होणार असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. रिलीजनंतर हे लगेचच समोर आले आहे. गेली अनेक आठवडे टीआरपीवर नंबर वन असलेल्या अनुपमाला क्यों की..ला पहिल्या आठवड्यातच मागे टाकले आहे.
आता क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेने आणखी एक विक्रम केला आहे. जो आजपर्यंत कोणत्याही टीव्ही मालिकेने केला नाहीये. सिरियल लॉंच झाल्यानंतर जवळपास 1.69बिलियन मिनिट व्ह्यूज मिळाले आहेत. हे आतापर्यंतच्या फिक्शन प्रकारातील मालिकेबाबत पहिल्यांदाच असे झाले आहे. तर मालिका रिलीज झाल्यापासूनच्या चार दिवसात 31.1 मिलियन टीव्ही व्ह्यूज मिळाले आहेत.
आमच्या शोने इतिहास रचला आहे. लोक म्हणतात इतिहास परत परत होत नाही. पण मला वाटत आहे की आम्ही त्याला मागे टाकले आहे. आम्ही पुन्हा इतिहास घडवला आहे. आज प्रसिद्धीच्या झोतात असलेला शो 25 वर्षांनंतर पुन्हा येऊन तितकीच प्रसिद्धी मिळवतो हे म्हणावे तितके सोपे नाही. टेलिव्हिजनचा विश्वात या शिखरावर पोहोचणे ही एक खूप मोठी गोष्ट आहे.