

Sunjay Kapur Funeral Delay
मुंबई - अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उशीरा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या अमेरिकन नागरिकत्वाशी संबंधित कायदेशीर औपचारिकतेमुळे विलंब होऊ शकतो.
५३ वर्षीय संजय कपूर यांचे १२ जून (गुरुवार) रोजी इंग्लंडमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो मॅचदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, कपूर हे अमेरिकन नागरिक होते आणि त्यांचे निधन यूकेमध्ये झाले होते, त्यामुळे त्यांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी भारतात आणण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रियेला बराच वेळ लागला.
रिपोर्टनुसार, संजय यांचे सासरे आणि त्यांची सध्याची पत्नी प्रिया सचदेव यांचे वडील अशोक सचदेव यांनी एका चॅनेलला सांगितले की, "अंत्यसंस्कार दिल्लीत होतील सध्या शवविच्छेदन सुरू आहे. कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर, पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी भारतात आणला जाईल.''
संजय कपूर यांच्या मागे त्यांची पत्नी प्रिया सचदेव आणि मुलगा अजारिया आहे. तर करिश्मा कपूर आणि मुलगी समायरा आणि मुलगा कियान आहे.