Chandu Champion | 'कार्तिक आर्यन राष्ट्रीय पुरस्काराचा पूर्ण हक्कदार’ - कबीर खान

Kartik Aaryan Chandu Champion - “चंदू चॅम्पियन”ला एक वर्ष पूर्ण, कार्तिक आर्यनची कामगिरी राष्ट्रीय पारितोषिकासाठी पात्र आहे
image of Kartik Aaryan Chandu Champion
Kartik Aaryan Chandu Champion movie one-year completed Instagram
Published on
Updated on

Chandu Champion one-year completed

मुंबई - कबीर खान यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या प्रेरणादायी बायोपिक चंदू चॅम्पियनला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या, समीक्षकांच्या आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीच्या मनात आपली जागा राखून ठेवली आहे.

भारताचे पहिले पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या असामान्य जीवनावर आधारित या चित्रपटात कार्तिक आर्यनने मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाने, भावनिक सादरीकरणाने आणि शारीरिक रूपांतराने सर्वांची मनं जिंकली.

image of Kartik Aaryan Chandu Champion
Panchayat 4 Cast Fees | 'पंचायत 4' साठी कुणी किती पैसे घेतले? सचिव जींनी नीना गुप्ता यांना टाकलं मागं

दिग्दर्शक कबीर खान म्हणतात, “चंदू चॅम्पियनला मिळालेल्या यशामागे सर्वात मोठा वाटा कार्तिकच्या समर्पणाचा आहे – त्याची मेहनत, त्याचे इमोशन्स आणि अभिनयातील बारकावे – हे सगळं अप्रतिम होतं. मला खरंच वाटतं की या भूमिकेसाठी तो राष्ट्रीय पुरस्काराचा पूर्णपणे हकदार आहे. ही भूमिका केवळ त्याच्या करिअरसाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाची होती. त्याने एका विस्मरणात गेलेल्या खऱ्या नायकाची कथा संपूर्ण आदराने आणि प्रामाणिकपणाने लोकांपर्यंत पोहोचवली.”

चंदू चॅम्पियन चित्रपटाने मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हलपासून न्यू यॉर्क इंडी फिल्म फेस्टिव्हलपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर गौरव मिळवला आहे. भारतातील विविध पुरस्कार सोहळ्यांमध्येही या चित्रपटाने बाजी मारली.

कार्तिक आर्यनसाठी हा चित्रपट करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. आपल्या "चॉकलेटी" प्रतिमेतून बाहेर पडत त्याने एका गंभीर, खऱ्या आणि प्रेरणादायी व्यक्तिरेखेचे दर्शन घडवले. त्याच्या भूमिकेतील प्रामाणिकता, मेहनत आणि अभिनयाने चंदू चॅम्पियन केवळ एक चित्रपट न राहता, एक सशक्त प्रेरणादायी संदेश बनून राहिला आहे.

image of Kartik Aaryan Chandu Champion
Sushant Singh Rajput Rejected Films | सुशांतने का नाकारले होते 'हे' ८ चित्रपट, ३ मधून तर रणवीर सिंहने मारली सिक्सर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news