

Sushant Singh Rajput Death Anniversary
मुंबई - सुशांत सिंह राजपूत या जगाचा निरोप घेऊन ५ वर्ष झाले आहेत. त्याचे १४ जून २०२० रोजी निधन झाले होते. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. पैकी ८ चित्रपट त्याने नाकारले होते. ३ चित्रपटांतून रणवीर सिंहने बाजी मारली तर २ चित्रपट महाडिझास्टर ठरले होते.
सुशांत सिंह राजपूतने टीव्ही मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याला २०१३ मध्ये काई पो चे मधून चित्रपट इंडस्ट्रीसाठी ब्रेक मिळाला. एम एस धोनीसारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सुशांतने आठ चित्रपट नाकारले होते.
संजय लीला भन्साळी यांनी Goliyon Ki Raasleela Ram-Leela चित्रपट सुशांत सिंह राजपूतला ऑफर केली होती. पण यशराज फिल्म्स सोबत कॉन्ट्रॅक्ट असल्याकारणाने त्याला हा चित्रपट करता आला नाही. मग रणवीर सिंहला ही भूमिका मिळाली. २०१३ ला हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटाने २०१.४ कोटी कमाई केली होती.
हिट चित्रपट 'बाजीराव मस्तानी' २०१५ मध्ये रिलीज झाला. सर्वात मोठ्या हिट चित्रपटासाठीसाठी पुन्हा संजय लीला भन्साळी यांनी सुशांतला पहिली पसंती दिली होती. पण त्यावेळी सुशांत 'पानी'मध्ये काम करत होता. पुन्हा रणवीर सिंगच्या झोळीत हा चित्रपट पडल. चित्रपटाने ३५८ कोटी कमावले होते.
दिग्दर्शक आदित्य चोप्राचा 'बेफिक्रे' हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. ते सुशांत सिंग राजपूतला चित्रपटात घेऊ इच्छित होते, पण नंतर हा चित्रपट रणवीर सिंगकडे गेला. चित्रपटाने फक्त १०३ कोटी कमावले.
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला दिग्दर्शक अभिषेक कपूरचा 'फितूर' हा चित्रपट प्रथम सुशांत सिंग राजपूतला ऑफर करण्यात आला होता, परंतु सुशांत त्यावेळी एम धोनी अनटोल्ड स्टोरीच्या शूटिंगमध्ये बिझी होता., म्हणून त्याने ऑफर नाकारली. त्यानंतर आदित्य रॉय कपूरने चित्रपटात काम केले. हा चित्रपट अपयशी ठरला. चित्रपटाने केवळ ४२.३८ कोटी कमावले.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी पद्मावत चित्रपटसाठी सुशांत सिंग राजपूतला ऑफर दिली होती. परंतु, तारखांच्या अडचणींमुळे हा चित्रपट त्याला करता आला नाही. पुढे रणवीर सिंगने भूमिका साकारली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ५७२ कोटींची कमाई केली.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक मोहित सुरी यांचा हाफ गर्लफ्रेंड हा चित्रपट सुशांतला मिळणार होता. बिझी शेड्युलमुळे चित्रपट अर्जुन कपूरकडे गेला. या चित्रपटाने ९७.७ कोटींची कमाई केली.
‘अंधाधुन’मध्ये आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होता, परंतु या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूत पहिली पसंती होती. चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांना सुशांतने या चित्रपटात काम करावे असे वाटत होते. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ४५६.८९ कोटींची कमाई केली.
शाहिद कपूरच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला त म्हणजे ‘कबीर सिंग’. निर्मात्यांची पहिली पसंती सुशांतच होता. परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली. मग हा चित्रपट अर्जुन कपूरकडे गेला. पण त्यानेही नकार दिला. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या संदीप वांगा रेड्डी यांच्या या चित्रपटाने ३७९ कोटी रुपये कमावले.