Pahalgam Attack Suniel Shetty Kesari Veer Film not releasing in Pakistan
मुंबई : सुनील शेट्टी यांचा आगामी चित्रपट ‘केसरी वीर : लीजेंड्स ऑफ सोमनाथ’ बद्दल एक अपडेट समोर आलीय. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे की, केसरी वीर पाकिस्तानमध्ये रिलीज होणार नाही. काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माते कनु चौहान यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
निर्मात्यांनी संताप व्यक्त करत पाकिस्तानात चित्रपट रिलीज न करण्याची घोषणा केलीय. हा चित्रपट १६ मे रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.
ऐतिहासिक ॲक्शन-ड्रामामध्ये सूरज पंचोली, विवेक ओबेरॉय आणि आकांक्षा शर्मा देखील आहे. चौदाव्या शतकात वीर र योद्धा द्वारा सोमनाथ मंदिराच्या संरक्षणाची कहाणी पुन्हा पाहता येणार आह. त्यांची वीरता आणि बलिदानाची कहाणी त्यांना पाहता येणार आहे. पाकिस्तान मार्केट सोडून ‘केसरी वीर’ भारत , अमेरिका, गल्फ देश, युके, उत्तरी अमेरिकेतील थिएटर रिलीजसाठी तयार आहे. ट्रेलर लॉन्च २९ एप्रिल रोजी मुंबईत रिलीज केला जाईल. चित्रपटात सुनील शेट्टी योद्धा वेगडा यांच्या भूमिकेत असेल तर सूरज पंचोली राजपूत राजकुमार हमीरजी गोहिल यांची भूमिका साकारली आहे.
"अगली छुट्टी जो होगी, वो कश्मीर में ही होगी" असे म्हणत सुनील शेट्टीने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नागरिकांना निर्भय राहण्याचे आवाहन केले आहे.