

Pahalgam Attack Kapoor Abir Gulaal songs removed
मुंबई :
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूरचा चित्रपट 'अबीर गुलाल' 9 मे ला रिलीज होणार होता. पण पहलगाम हल्ल्यानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. रिलीजच्या आधी चित्रपटात वादात अडकला. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर चित्रपटातील गाणी यूट्यूब हटवण्यात आलीय. सोशल मीडियावर वाणी कपूरला देखील विरोध सुरू झाला आहे.
'अबीर गुलाल'मधील दोन गाणी- 'अंगरेजी रंगरसिया' आणि 'खुदाया इश्क' आधीच यूट्यूबवर रिलीज करण्यात आले होते. पण आता भारता ते युट्यूबवर दिसत नाहीत.
ही गाणी ए रिचर लेंस एंटरटेनमेंटच्या ऑफिशियल चॅनल आणि म्युझिक लेबल सारेगामाच्या यूट्यूब चॅनलवरून देखील हटवली गेली आहेत. आतापर्यंत चित्रपट निर्मात्याकडून आणि कलाकारांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, वाणीने २२ एप्रिलला शेअर केलेला प्रमोशनल व्हिडिओ डिलीट केला आहे, ज्यामध्ये ती फवाद खान सोबत दिसली होती.
पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर #boycottvaanikapoor ट्रेंड होता. सोशल मीडियावर युजर्स म्हणू लागले की, इतक्या मोठ्या हल्ल्यावर वाणी कपूरने मौन का बाळगले आहे? दुसरीकडे वाणीने एक भावूक पोस्ट शेअर केली होती- यामध्ये तिने म्हटलं होतं-'जेव्हा पहलगामची घटना पाहिलीय, मी सुन्न आहे. शब्द मिळत नाहीत. निष्पाप लोकांवर झालेला हा हल्ला खूपचं मन हेलावून टाकणारं आहे. माझी प्रार्थना त्या सर्व परिवारांसोबत आहे, जे या दु:खातून जात आहेत.'