Fawad Khan Vaani Kapoor Movie Abir Gulaal Ban
मुंबई : काश्मीरधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर अबीर गुलाल या चित्रपटावर बंदी मागणी होत होती. आता अभिनेत्री वाणी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांचा आगामी चित्रपट 'अबीर गुलाल'च्या प्रदर्शनास भारतात बंदी घालण्यात आलीय. लोकांचा रोष पाहता सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात अंदाधुंद गोळीबार करून २८ जणांची निर्घृण हत्या केली. त्यामुळे पाकिस्तान विरोधात लोकांमध्ये रोष आहे. परिणामी, अबीर गुलाल चित्रपटाच्या रिलीजवर त्याचा परिणाम झाला. कारण या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान मुख्य भूमिकेत आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर स्क्रिन शेअर करणार आहे. एकूण वातावरण पाहता आता सरकारकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर भारतात बंदी आणल्याचे वृत्त समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर चित्रपटाची रिलीज डेट आज टळली होती. त्यानंतर अबीर गुलालच्या प्रदर्शनावर भारतात बंदी केली आहे. ‘अबीर गुलाल’ मधून फवाद खान तब्बल ९ वर्षांनी बॉलीवूडमध्ये वापसी करणार होता. त्याने ‘खूबसूरत’, ‘कपूर अँड सन्स’, ‘ऐ दिल है मुश्किल’ सारख्या तीन बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
वाणी कपूरने सोशल मीडियावर लिहिलं, ‘पहलगाममध्ये निर्दोष लोकांवरील हल्ला पाहून मी स्तब्ध आहे. मन तुटलं आहे. माझ्या प्रार्थना पीडित परिवारांसोबत आहे.'
'पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचे वृत्त ऐकून खूप दु:ख झालं. या भयावह घटनेच्या पीडित लोकांच्या प्रति आमच्या संवेदना आणि प्रार्थना आणि त्यांच्या परिवारांसाठी या कठीण समयी शक्ती आणि उपचाराची प्रार्थना करतो.'
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान