

Suniel Shetty Granddaughter: बॉलीवूड अभिनेता सुनिल शेट्टीचा आपल्या १५ महिन्याच्या नातीवर जास्त जीव आहे. इवाराबद्दल बोलताना आजोबा सुनिल शेट्टी थकत नाहीत. ते प्रत्येक मुलाखतीत तिचा उल्लेख करतात. नुकतेच त्यांनी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत त्यांची नात सकाळी उठल्या उठल्या काय करते याबाबत माहिती दिली. सुनिल शेट्टींनी सांगितलं की त्यांची १५ महिन्याची नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला लाडूचा प्रसाद दाखवते.
सुनिल शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांना इवाराला पाहिल्याची घटना आठवतात. ते म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या नातीची पहिली ओळख ही तिच्या नॅनीने विमानतळावर करून दिली होती. तेव्हापासून माझी नात पंतप्रधानांबाबत आकर्षित झाली आहे.
सुनिल शेट्टी पुढे म्हणतात, 'मी कायम सांगत असतो की मी पंतप्रधानांचा मोठा चाहता आहे. मी त्यांच्या पक्षाबाबत बोलत नाहीये. मी एक नेता म्हणून सांगतोय. जर कोणता नेता मला आकर्षक वाटतो तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. मी जेवढं माझ्या देशावर प्रेम करतो तेवढंच मी या माणसावर प्रेम करतो. त्यांच्यामध्ये असं काहीतरी खास आहे. माझी १५ महिन्यांची नात एकदाच तिच्या नॅनीसोबत गेली होती त्यावेळी तिला मोदीजींबाबत सांगितलं. आता ती प्रत्येक सकाळी साई बाबांचे पुस्तक उघडते आणि त्यात मोदीजींचा फोटा आहे त्याला लाडवाचा प्रसाद दाखवते.'
सुनिल शेट्टी पुढे म्हणतात, 'माझी नात पुस्तक उघडते आणि म्हणजे मोदीजी. त्यानंतर ती गणपतीजवळचा लाडू घेऊन येते आणि ती मोदीजींच्या फोटोला दाखवते. मी तिला असं करण्यास सांगितलं नाही. किंवा तिच्या कुटुंबीयांना देखील असं तिला करण्यास सांगितलेलं नाही. मात्र त्यांच्यात असं काहीतरी आहे. त्यांच्यात जादुई असं काहीतरी आहे.'
इवारा ही अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी गोंडस इवाराला २४ मार्च २०२५ रोजी जन्म दिला. त्यांनी केएल राहुलच्या वाढदिवसादिवशी संपूर्ण जगाला इवाराची ओळख करून दिली होती. त्यानंतर त्यांनी इवाराचे नाव उघड करत त्याचा अर्थ देवाचे गिफ्ट असा होतो असं सांगितलं.
जेव्हापासून उवाराचा जन्म झाला आहे तेव्हापासून अथिया आणि राहुल यांनी इवाराला पब्लिकमध्ये आणलेलं नाही. त्यांनी तिचा चेहरा न उघड करता तिचे फोटो शेअर केले आहेत. दोन्ही कुटुंबीय यात सुनिल शेट्टीचा देखील समावेश आहे. ते सातत्याने आपल्या नातीसोबत मोठ्या उत्साहात बोलताना दिसत आहे. सुनिल शेट्टीने इवारा ही अथिया २.० आहे असं देखील गंमतीनं म्हणतो.
सुनिल शेट्टी यांचा नवा चित्रपट वेलकम टू द जंगल हा २६ जूनला रिलीज झाला आहे. या चित्रपटाबाबत समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १८ कोटी रूपये मिळवत समाधानकारक सुरूवात केली होती. या चित्रपटात अक्षय कुमार, राजपाल यादव, परेश रावल, अर्शद वारसी, रवीना टंडन, दिशा पटानी आणि जॅकलिन फर्नांडीस यांची प्रमुख भूमिका आहे.