

मसूरीच्या घाटात शूट केलेला श्रिया पिळगावकरचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा नैसर्गिक आणि ताजेतवाना लूक फॅन्सना खूप आवडला असून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.
Shriya Pilgaonkar -Mussoorie travel photos and videos goes viral
अभिनेत्री श्रिया पिळगावकर नेहमीच तिच्या हटके लूक,ट्र्रॅव्हलमधील फोटो, स्टाईलमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे कारण तिने शेअर केलेला ‘मसुरी की वादियों मधील सुंदर व्हिडिओ. सोशल मीडियावर तिच्या ट्रॅव्हल डायरीतले फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
सध्या श्रिया पिळगावकर चांगलीच चर्चेत आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या आगामी 'हैवान' या चित्रपटामुळे श्रियाची चर्चा आहे. अक्षय कुमार आणि सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये मल्याळम सुपरस्टार मोहनलालदेखील काम करणार आहेत. आता श्रियादेखील दिसणार असून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले
दरम्यान, Mussoorie तून श्रिया पिळगावकरचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पर्वतांच्या कुसीत रमणाऱ्या श्रियाने मसुरीचे निसर्ग सर्वांसमोर आणले आहे. हिल-गेटवेचे काही क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर फोटो, व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनदेखील लिहिली आहे. नैसर्गिक सौंदर्याची झलक तिच्या फोटोंतून दिसत आहे.
पर्वतराजींतील शांतता, नैसर्गिक सुगंध, सुंदर अनुभव तिने लोकांसमोर उलगडला. तिने आपल्या पाळीव कुत्र्यांसोबत, सूर्यास्तासोबत, फॅमिलीसोबतचे क्षण अनुभवल्याचे सांगितले.यावर फॅन्सकडून कमेंट येत आहे. अनेकांनी म्हटले आहे की, हे पोस्ट व फोटो पाहाताच मन शांत झाले. कलाकारांचे आयुष्य तर सेटच झालं. अशीच छान दिसता मॅडम, तुझं हास्य खूप सुंदर आहे.
अभिनेत्री म्हणून अनेक महत्वाची वेब-सीरिज व चित्रपट केलेल्या श्रिया पिळगावकरने थोडासा वेळ काढून निसर्गातल्या चमत्कारांचा अनुभव घेतला. विंटर व्हेकेशन टाईम तिने स्पेंड केलाय. कामाच्या धकाधकीतून बाहेर पडून, ऊंच पर्वत, निसर्गात थोडा वेळ घालवणाऱ्या श्रियाचे हे फोटो नक्की पाहा.