

Rasha Thadani south film debut with telugu star
मुंबई - अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी आणि अभिनेत्री राशा थडानी बॉलीवूडनंतर साऊथ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. अभिनेत्री राशा थडानी आगामी तेलुगु चित्रपटात अभिनय साकारणार असून एका दिग्गज सुपरस्टारच्या भाच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
राशाने अल्पावधीतच आपल्या ग्लॅमरस लूकमुळे, फॅशनमधील प्रयोगांमुळे आणि सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे बरीच लोकप्रियता मिळवली आहे. तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकावे अशी मागणी चाहत्यांकडून कायम होत होती. अखेर ती साऊथमधून आपल्या करिअरची धमाकेदार सुरुवात करत आहे. चित्रपटाच्या टीमने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी आतल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रोजेक्टचे दिग्दर्शन एका नामांकित फिल्ममेकरकडून होणार आहे.
या चित्रपटात राशा आणि सुपरस्टारच्या भाच्याची नवी ऑन-स्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे. दोघांचाही फ्रेश लूक आणि तरुणाईला भुरळ पाडणारी केमिस्ट्री पाहता येणार आहे. निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट रोमँटिक ड्रामा असणार आहे. शूटिंग लवकरच सुरू होणार असून बहुतांश शूटिंग साऊथमधील निसर्गरम्य ठिकाणी करण्यात येणार आहे.
राशाने एक सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तेलुगू चित्रपटाची घोषणा केलीय. अभिनेता महेश बाबूचा भाचा जय कृष्ण घट्टामनेनी सोबतच ती तेलुगु चित्रपटात पदार्पण करेल.
कोण आहे जय कृष्ण घट्टामनेनी?
जय कृष्ण हा साऊथ अभिमेता महेश बाबूचा भाचा आहे. त्याचा हा पहिला तेलुगु चित्रपट असून अभिनयाचा प्रवास तो राशा सोबत करणार आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर राशाचा एक फोटो शेअर केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अजय भूपती करणार आहेत. सध्या चित्रपटाचे नाव एबी४ असले तरी ते अद्याप फायनल नसल्याचे म्हटले जात आहे. राशाने इन्स्टाग्रामवर लिहिलं, ‘नवी सुरुवात, अंतहीन आभार, आपल्या सर्वांच्या प्रेमासोबत मी तेलुगु सिनेमामध्ये पाऊल ठेवत आहे.’
अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी अभिनेत्री राशा थडानीने यावर्षी आजादमधून बॉलिवूड डेब्यू केला होता. तिच्यासोबत अभिनेता अजय देवगनचा भाचा अमन देवगन मुख्य भूमिकेत होता. पण या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी जादू चालली नाही. आता राशा तेलुगु चित्रपटामधून काय जादू दाखवते, हे पाहणं रंजक असेल. शिवाय ती अभय वर्मा सोबत Laikey Laikaa या बॉलीवुडपटात दिसणार आहे.