Govinda-Sunita Divorce rumors| 'मागील २ वर्षे कठीण काळ..घरात अशांती.. ' गोविंदाच्या मुलीने सांगितले सत्य काय?

Govinda-Sunita Divorce rumors | 'मागील २ वर्षे कठीण काळ..घरात अशांती.. ' गोविंदाच्या मुलीने सांगितले सत्य काय?
Govinda-Sunita
Govinda-Sunita Divorce rumorstina clarifyinstagram
Published on
Updated on
Summary

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनिता यांच्याबाबत घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुलीने प्रतिक्रिया देत मागील दोन वर्षे कुटुंबासाठी कठीण असल्याचे सांगितले. घरात काही काळ तणावाचे वातावरण होते. तिच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहूजा यांच्यातील घटस्फोटावर त्यांची मुलगी टीना आहूजाने खुलासा केला आहे. मागील २ वर्ष त्यांच्या परिवारासाठी खूप कठीण काळ ठरला आहे. तिने आपली आई सुनीतासाठी वुमन्स डेला एक गिफ्ट देखील खरेदी केलं होतं. सुनीताने आधीच गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरचे आरोप केले होते. त्यावर गोविंदाने स्पष्टीकरण दिलं होतं.

गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहुजा (Sunita Ahuja) मागील काही काळापासून चर्चेत आहेत. त्यांच्यामध्ये सर्व काही ठिक नसल्याचे वृत्त समोर आले होते. रोज काही ना काही अपडेट समोर येताहेत. मागील काही दिवसांपूर्वी, सुनीताने गोविंदावर आरोप लावला होता की, अभिनेता गोविंदाचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु आहे. आता तिच्या मुलीने टीनाने गोविंदा-सुनीता यांच्या नात्यात आलेल्या दुराव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Govinda-Sunita
Trending Song Aaya Sher film The Paradise | तब्बल अडीच एकरांवर उभारला स्लम सेट, ‘आया शेर’ गाणं पाहायलाचं हवं! हटके मुव्ह्जची सोशल मीडियावर चर्चा

टीनाने सुनीतासाठी खरेदी केलं गिफ्ट

वुमन्स डेला टीनाने आपल्या आईच्या यूट्यूब चॅनलवर ब्लॉग केलं. तिने सुनीताला फ्लॉवर आणि एक अंगठी देखील गिफ्ट केली. व्हिडिओमध्ये टीना म्हणताना दिसते, आम्ही महिला दुसऱ्यांसाठी खूप काही करतो. पण आपल्याबद्दल कधी विचार करत नाही. याच कारणामुळे मी माझ्या वुमनसाठी काहीतरी स्पेशल करायचा विचार केला.

काय म्हणाली टीना?

टीनाने गोविंदा आणि सुनीताच्या घटस्फोटावर स्पष्ट केले. ती म्हणाली- 'हे दोन वर्ष चांगले ठरले नाहीत. खूप चढ-उतार आले आहेत. 'टीनाने म्हटलं, खरं सांगायचं झालं तर आमची मागील २ वर्षे खूपच खराब गेले. घरात खूप काही सुरू होतं. खूप अशांती होती. इतकेच बोलताना सुनीतासाठी कार्ड आणि फूल खरेदी करताना पाहण्यात आले. टीना म्हणते की, आता ती दुसऱ्या शहरात राहत आहे. नुकतेच ती भाज्या आणि घरासाठी आवश्यक वस्तू खरेदी करणे शिकले आहे.

Govinda-Sunita
Aneet Padda in Madhubala biopic? - सैयारा फेम अनीत पड्डा मधुबालाच्या बायोपिकमध्ये? नेटिझन्स म्हणाताहेत...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news