Aneet Padda in Madhubala biopic? - सैयारा फेम अनीत पड्डा मधुबालाच्या बायोपिकमध्ये? नेटिझन्स म्हणाताहेत...

Aneet Padda in Madhubala biopic? अनीत पड्डा साकारणार मधुबालाची भूमिका?
Aneet Padda - Madhubala
Aneet Padda in Madhubala biopic?instagram
Published on
Updated on
Summary

बॉलिवूडमध्ये दिग्गज अभिनेत्री मधुबालाच्या आयुष्यावर बायोपिक बनणार असल्याच्या चर्चांदरम्यान आता अभिनेत्री अनीत पड्डा हिचं नाव समोर येत आहे. ‘सैयारा’मधील भूमिकेमुळे चर्चेत आलेली अनीत पड्डा मधुबालाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. अनेक नेटिझन्स तिच्या लूकची तुलना मधुबालाशी करत असून काहींना ती या भूमिकेसाठी योग्य वाटत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे नेटिझन्सनी आणखी एका अभिनेत्रीचे नाव समोर ठेवले आहे.

Aneet Padda in Madhubala biopic? whats true

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि सदाबहार अभिनेत्री मधुबाला (Madhubala) यांच्या आयुष्यावर बायोपिक बनण्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहेत. या बायोपिकमध्ये मधुबालाची भूमिका कोण साकारणार, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. कियारानंतर या भूमिकेसाठी अभिनेत्री अनीत पड्डा हिचं नाव चर्चेत आलं आहे. पण सत्य काय आहे?

अलीकडे सोशल मीडियावर काही पोस्ट आणि चर्चांमुळे अनीत पड्डा मधुबालाच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘Saiyaara’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या अनीत पड्डाने अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या व्यक्तिमत्त्वाची आणि लूकची तुलना काही नेटिझन्स मधुबालाशी करताना दिसत आहेत.

Aneet Padda - Madhubala
Malaika Arora | मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? कोण आहे सोराब बेदी? व्हायरल व्हिडिओने डेटिंगच्या चर्चांना उधाण

पण रिपोर्टनुसार, इंडस्ट्रीतील सूत्रांनी या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले आहे. एका सूत्राने स्पष्ट सांगितले की, अनीत पड्डाचे नाव मधुबालाच्या बायोपिकशी जोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. अनीत पड्डाबद्दल जे काही दावे केले जात आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. हे दावे पूर्णपणे निराधार आहेत.

मधुबाला हे भारतीय सिनेमातील अतिशय मोठे नाव आहे. अनीतच्या अफवा पसरल्यानंतर सूत्रांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, अनीत पड्डा या प्रोजेक्टशी जोडल्या गेल्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत आणि सध्या तरी असे काहीही घडत नाही.

Aneet Padda - Madhubala
Trending Song Aaya Sher film The Paradise | तब्बल अडीच एकरांवर उभारला स्लम सेट, ‘आया शेर’ गाणं पाहायलाचं हवं! हटके मुव्ह्जची सोशल मीडियावर चर्चा

अनीतचा पहिला चित्रपट 'सैयारा' (२०२५) रिलीज झाल्यानंतर, अहान पांडे आणि अनित पड्डा हे रातोरात स्टार बनले. अहानने अली अब्बास जफरसोबत त्याचा पुढचा चित्रपट साईन केला, तर मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा चित्रपट 'शक्ती शालिनी'साठी अनीतची निवड झाली. दरम्यान, मधुबाला यांच्या भूमिकेसाठी कियारा अडवाणीचे नाव समोर आळे. त्यानंतर अनितचे नाव मधुबालाच्या भूमिकेसाठी चर्चेत आले.

दुसरीकडे काही नेटिझन्स म्हणताहेत- मधुबालाच्या बायोपिकसाठी तृप्ती डिमरी ही एक चांगली निवड असेल. मला या भूमिकेसाठी फक्त एकच दिसत आहे ती तृप्ती आहे... तिच्यात ती निरागसता आणि अभिनय आहे,” तर दुसऱ्या नेटकऱ्याने मान्य केले की, “ती ही भूमिका करू शकते. तृप्ती तिच्या डोळ्यांनी अभिनय करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news