स्टँडअप कॉमेडियन नवीन प्रभाकर आता रंगभूमी गाजवण्यास सज्ज

navin prabhakar
navin prabhakar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक चित्रपट, टीव्ही कार्यक्रमांतून ओळख निर्माण केलेला स्टँडअप कॉमेडियन, अभिनेता 'पैचान कौन' फेम नवीन प्रभाकर आता रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज आहे. 'कॉमेडी नाइट्स' या कार्यक्रमातून नवीन प्रभाकर पहिल्यांदाच रंगभूमीवर येत असून, पहिल्या प्रयोगाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

अनेक चित्रपटांची निर्मिती, प्रस्तुती केलेल्या स्वरुप स्टुडिओजच्या प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार आणि प्रतिक मेहता यांनी "कॉमेडी नाइट्स"ची निर्मिती केली आहे. नवीन प्रभाकरसह या कार्यक्रमात राजकुमार रँचो आणि नितीन भंडारकर यांचाही सहभाग आहे.

नवीन प्रभाकरने आतापर्यंत स्टँडअप कॉमेडीचे तीन हजारहून अधिक कॉर्पोरेट शोज केले आहेत. त्यातून त्याने स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळेच आता रंगभूमीवर येत असलेल्या नवीन प्रभाकरच्या कॉमेडी नाईट्स कार्यक्रमाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news