सनी लिओनीच्या केनेडी चित्रपटाचे जगभरात कौतुक; NIFFF-BIFAN मध्ये प्रीमियर होणार

sunny Leone
sunny Leone

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनीचा बहुचर्चित चित्रपट 'केनडी' या चित्रपटाचा दोन महत्त्वपूर्ण महोत्सवांमध्ये प्रदर्शित होणार आहे. १ जुलै आणि ४ जुलै (NIFFF) मध्ये आणि २ जुलै आणि ८ जुलै रोजी Bucheon International Fantastic Film Festival (BIFAN) मध्ये प्रीमियर होणार आहे. या अभिनेत्री चार्ली या स्त्रीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला जागतिक प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. या घोषणेनंतर स्विस आणि दक्षिण कोरियन चित्रपटसृष्टीचे रसिक, तसेच सनीचे चाहते तितकेच उत्साही आहेत.

केनडीमधील सनी लिओनच्या अभिनयाची समीक्षकांनी खूप प्रशंसा केली आहे. ज्यांनी चित्रपटाच्या मागील स्क्रिनिंगमध्ये आधीच पाहिले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिडनाईट स्क्रीनिंगमध्ये त्याचा प्रीमियर झाला. जिथे त्याला सात मिनिटांचा स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या पराक्रमाने आणि निर्विवाद सौंदर्याने, सनीने जागतिक स्तरावर सगळ्यांचं मन जिंकले आहे.

सनी लिओनीच्या केनडीमध्ये मुख्य भूमिकेत राहुल भट्ट आहे. दिग्गज चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. केनडी व्यतिरिक्त, सनीचे आणखी काही रोमांचक प्रोजेक्ट येणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news