Srishty Rode : सृष्टीने तोडली ‘संस्कारी सून’ वाली इमेज, मोनोकिनीत बोल्ड अंदाज

Srishty Rode
Srishty Rode
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सृष्टी रोडे (Srishty Rode) ही बिग बॉस १२ ची (Bigg Boss 12) स्पर्धक आहे. बिग बॉस-१२ मधून तिला चांगली लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय ती किचन चॅम्पियन ५ मध्येही दिसली होती. सृष्टी रोडे इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह राहते. ती आपले ग्लॅमरस आणि सुंदर फोटो शेअर करते. आताही तिने ब्लॅक मोनोकिनीमध्ये दिलकश अदा दाखवल्या आहेत. पुलामध्ये भिजलेल्या केसात सृष्टीने आपला बोल्डनेस दाखवला आहे. तिच्या फोटोंवर लाखो फॅन्सनी कमेंट केले आहेत. आताही तिने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातलाय. (Srishty Rode)

इश्क हाय, छोटी बहू, शोभा सोमनाथ की, चलती का नाम गाडी, सरस्वतीचंद्र आणि इश्कबाज यासारख्या टीव्ही मालिकांमध्य़े सृष्टीने काम केलंय. २०१८ मध्ये तिने बिग बॉसच्या १२ व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

सृष्टीचा ग्लॅमरस अंदाज फॅन्सना खूप आवडतोय. ती वेगवेगळ्या स्टायलिश आऊटफिटमध्ये फोटो शेअर करत राहते. तिला बिग बॉस १२ मधून रातोरात लोकप्रियता मिळाली होती. तिचं नाव रोहित सुचांतीशी नाव जोडण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, तिचं रिलेशनशिप आधी मनीष नागपालसोबत होतं. असं म्हटलं जातं की, त्यांचा साखरपुडाही झाला होता. बिग बॉस-१२ नंतर दोघांचा ब्रेकअप झाला.

सृष्टीला पोटाची तक्रार झाल्यानंतर तिची सर्जरीही झाली होती. तिने ही माहिती तिने सोशल मीडियावर दिली होती. बिग बॉस १४ ची विजेता रुबीना दिलैकची ती बेस्ट फ्रेंडदेखील आहे. तिला फिरायला खूप आवडतं. ती कधी माउंटेन तर कधी समुद्राच्या ठिकाणी व्हेकेशनसाठी निघून जाते. टीव्ही मालिकांमध्येही तिने काम केलंय. तिने २००७ मध्ये 'कुछ इस तरह' मध्ये कॅमियो केला होता. यातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Srishty Rode (@srishtyrode24)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news