BB Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिला मोठा राडा; आर्या-निक्कीमध्ये शाब्दिक चकमक

'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिला राडा;आर्या-निक्कीमध्ये शाब्दिक चकमक
BB Marathi 5
आर्या-निक्कीमध्ये वाद निमार्माण झाला आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचं सर्वत्र कौतुक होत आहे. घरातील सदस्य एकमेकांची काळजी घेण्यासोबत राडेदेखील करत आहेत. आज एकीकडे घरात 'नॉमिनेशनची तोफ' हे पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. पहिल्याच टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये मोठं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होणार आहे. तसेच आर्याने अरबाजला आणि वैभव चव्हाणलादेखील फटकारलं आहे.

BB Marathi 5
Instagram

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि आर्या जाधव एकमेकांसोबत मोठमोठ्याने भांडताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये आर्याला निक्कीचा चांगलाच राग आलेला दिसून येत आहे. आर्या निक्कीला "तुला घाबरायला पाहिजे",म्हणत धमकी देताना दिसत आहे. तर निक्की तिला "फट्टू" म्हणते. त्यावर निक्की तिला "वेडी" म्हणते. आर्या पुढे म्हणते,"मला शांत करायचं नाही". आर्या आणि निक्कीचा राग अनावर झाला आहे. त्यामुळे नॉमिनेशन टास्क दरम्यान आणखी रंगत येणार आहे.

BB Marathi 5
Instagram

'हे' सदस्य झालेत नॉमिनेट

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि कोल्हापूरच्या पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश आहे. आता या सहा सदस्यांमधून कोण 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news