Splitsvilla 7 fame Mayank Pawar dies | स्प्लिट्सव्हिला ७ फेम मयंक पवारचे निधन

Splitsvilla 7 fame Mayank Pawar dies | सहा वेळा मिस्टर इंडियाचा किताब जिंकणाऱ्या मयंक पवारचे निधन
Mayank Pawar
Mayank Pawar diesinstagram
Published on
Updated on
Summary

टीव्ही रिअॅलिटी शो स्प्लिट्सव्हिला ७ फेम आणि फिटनेस आयकॉन, सहा वेळा मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा स्टार मयंक पवारचे वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झाले आहे. अचानक झालेल्या या घटनेने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत अधिकृत पोस्टवरून ही बातमी कळवण्यात आली असून निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या स्मरणार्थ २५ फेब्रुवारी रोजी प्रार्थना सभा ठेवण्यात आली आहे.

Mayank Pawar
Tara Sutaria New Home | एक नवी सुरुवात..तारा सुतारियाच्या स्वप्नातलं घर, शेअर केली इंटिरिअर झलक

टीव्ही रिअॅलिटी जगतातील एक प्रिय आणि लोकप्रिय चेहरा स्प्लिट्सव्हिला सीझन ७ मध्ये दिसलेला फिटनेस ट्रेनर मयंक पवारने वयाच्या फक्त ३७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या जाण्याची बातमी अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलीय.

मयंकने अलीकडेच १ जानेवारी, २०२६ रोजी त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या मृत्यूच्या वृत्तानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, मयक पवारचे २३ फेब्रुवारी, २०२६ रोजी वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यांच्या मृत्यूचे कारण पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेले नाही.

प्रार्थना सभेची घोषणेची एक पोस्ट देखील कुटुंबीयांनी शेअर केली होती. त्यानुसार, प्रार्थना सभा २५ फेब्रुवारी, २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाल्मिकी मंदिर, संगम पार्क, राणा प्रताप बाग येथे होणार आहे.

स्प्लिट्सव्हिला ७ मधून मिळाली ओळख

स्प्लिट्सव्हिला ७ मधील त्याच्या उत्तम खेळण्याने त्याला प्रसिद्धी मिळाली होती. त्याला जेव्हा शोतून बाहेर जावं लागलं होतं, तेव्हा सनी लिओनी देखील भावूक झाली होती. त्याचा को-होस्ट निखिल चिनपा देखील त्याला आलिंगन दिले होते. मयंक पवार खूप शांत स्वभावाचा होता.

तो एक फिटनेस ट्रेनर होता. बॉडीबिल्डिंगमध्ये त्याने अनेक किताब जिंकले होते. ज्यामध्ये Mr India चे टायटल देखील समाविष्ट आहे. त्याचे फिटनेसचे अनेक फोटो आणि व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर दिसतात.

Mayank Pawar
Film Bhooth Bangla | 'अब मजा आएगा ना भिडू' 'भूत बंगला'चे मोशन पोस्टर पाहून नेटकऱ्यांना आठवला 'भूल भुलैय्या', म्हणाले...

सोशल मीडियावर भावूक श्रद्धांजली

फॅन्सनी त्याच्या निधनाचे वृत्त आणि पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर श्रद्धांजली देणे सुरू केलं. अनेक लोकांनी लिहिलं की, त्यांना या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. काही जणांनी स्प्लिट्सविला -७ चे जुने व्हिडिओ क्लिप्स शेअर केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news