Film Bhooth Bangla | 'अब मजा आएगा ना भिडू' 'भूत बंगला'चे मोशन पोस्टर पाहून नेटकऱ्यांना आठवला 'भूल भुलैय्या', म्हणाले...

Film Bhooth Bangla Akshay Kumar | 'अब मजा आएगा ना भिडू..' 'भूत बंगला'चे मोशन पोस्टर पाहून नेटकऱ्यांना आठवला 'भूल भुलैय्या', म्हणाले...
actor Akshay Kumar
Akshay Kumar Film Bhooth Bangla poster released instagram
Published on
Updated on
Summary

‘भूत बंगला’ या नव्या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. पोस्टरचा लूक आणि पार्श्वसंगीत पाहून अनेक नेटकऱ्यांना ‘भूल भुलैय्या’ चित्रपटाची आठवण झाली. काहींनी चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली तर काहींनी थेट तुलना करत प्रतिक्रिया दिल्या.

बॉलिवूडमध्ये हॉरर-कॉमेडीचा ट्रेंड पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. अशातच ‘भूत बंगला’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. पोस्टरमध्ये दिसणारा अक्षय कुमार, भीतीदायक वातावरण अनेकांना थेट Bhool Bhulaiyaa चित्रपटाची आठवण झाली.

actor Akshay Kumar
Kerala Story 2 row | 'केरळ स्टोरी-२'चा टीझर रद्द? हायकोर्टात चित्रपट दाखवण्यास निर्माते तयार नाहीत

दस को देंगे दस-तक, इंतज़ार करो तब तक…मज़ा शुरू हो गया! अशी कॅप्शन लिहित खिलाडी कुमार अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भूत बंगलाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. त्याची तुलना चित्रपट भूलभुलैयाशी केली जात आहे.

अक्षय कुमार आणि निर्माते प्रियदर्शन तब्बल १६ वर्षांनंतर एकत्र या चित्रपटाच्या माध्यमातून काम करत आहेत. याआधी त्यांनी चित्रपटाने 'हेरा फेरी', 'हंगामा', 'भूल भुलैया' यासारखे चित्रपट दिले आहेत. दुसरीकडे, हे मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर फॅन्सना भूलभुलैयाची आठवण झालीय.

भूत बंगलाचे नवे मोशन पोस्टर रिलीज

मंगळवारी, अक्षयने भूत बंगलाचे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये तो धोतर घातलेला, हातात रुद्राक्षच्या माळा आणि गळ्यात एक रुद्राक्ष तसेच गॉगल घालून एका खुर्चीवर बसलेला दिसतो. त्या खुर्चीवर राक्षसांचे चेहरे बनलेले आहेत. भूतबंगला चित्रपटगृहात १० एप्रिल, २०२६ रोजी रिलीज होईल.

actor Akshay Kumar
Hardik Pandya gifts son car | हार्दिकचं पुत्र प्रेम! अगस्त्यला गिफ्ट केली तब्बल ४ कोटींची कार! एक्स वाईफ नताशाची अशी प्रतिक्रिया

नेटकऱ्यांनी केली 'भूलभुलैया'शी तुलना

नेटकऱ्यांनी मोशन पोस्टरवर तत्काळ प्रतिक्रिया दिलीय. एका कॉमेंटमध्ये त्यांनी हे पोस्टर भूलभुलैया वाईब्स का देत आहे, आणखी एकाने म्हटले - असली भूल भुलैया २.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news