Spirit Movie | संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटात मोठे ट्व‍िस्‍ट, रणबीरनंतर आता 'या' साऊथ स्टारची एन्ट्री, प्रभाससोबत २ स्टार्सची तगडी टक्कर!

Spirit Movie | संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटात मोठे ट्व‍िस्‍ट, रणबीर कपूरनंतर आता या साऊथ स्टारची एन्ट्री, प्रभाससोबत दोन स्टार्सची तगडी टक्कर
prabhas- sandeep reddy vanga -ranbir kapoor
after ranbir kapoor south star entered in prabhas sandeep reddy vanga Spirit MovieInstagram
Published on
Updated on
Summary

स्पिरिट’ चित्रपटात प्रभास आणि रणबीर कपूरनंतर आणखी एक मोठा साऊथ सुपरस्टार प्रवेश करणार आहे. संदीप रेड्डी वांगाच्या या पॅन-इंडिया प्रोजेक्टमध्ये तीन दमदार स्टार्सची तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. या तिसऱ्या स्टारच्या नावाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

after ranbir kapoor famous south star entry in Spirit Movie

मुंबई - ॲनिमलनतर संदीप रेड्डी वांगा नवा चित्रपट आणत आहेत. वांगा दिग्दर्शित 'स्‍प‍िरिट' चित्रपटाची सध्या चर्चा सुरु आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची एन्ट्री झाली आहे. एका रिपोर्टनुसार, संदीप रेड्डी वांगा आणि रणबीर कपूर पुन्हा एकदा एकत्र येताहेत. या चित्रपटात साऊथ स्टार प्रभास मुख्य भूमिकेत असून रणबीर कपूरला कॅमियो भूमिका ऑफर करण्यात आली आहे. दुसरीकडे, चित्रपटाच्या कथेत आणखी एक ट्विस्ट असणार आहे. आणखी एक प्रसिद्ध साऊथ स्टारची चित्रपटात एन्ट्री झाली आहे.

स्पिरिट’ हा एक जबरदस्त अ‍ॅक्शन ड्रामा असून त्यात प्रभास एका शक्तिशाली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. बिग बजेट, भव्य सेट, देशभरात शूटिंग आणि दमदार कथे मुळे हा चित्रपट यशस्वी ठरेल असे म्हटले जात आहे. संदीप वांगा स्वतः पटकथा आणि संवादांवर काम करत असून, हा चित्रपट सुपरहिट ठरेल, असे म्हटले जात आहे.

रिपोर्टनुसार, प्रभास आणि तृप्‍त‍ी ड‍िमरी स्‍टारर चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. हा चित्रपट तेव्हा चर्चेत आला, जेव्हा दीपिका पादुकोणला हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. पण कामाच्या तासावरून निर्मात्याशी वाद झाला आणि दीपिकाची जागा तृप्‍त‍ी डिमरीने घेतली.

prabhas- sandeep reddy vanga -ranbir kapoor
Celina Jaitly : १४ वर्षांनंतर संसारात मीठाचा खडा! सेलिनाचे पतीवर घरगुती हिंसाचार, शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप

याआधी तृप्तीने संदीप रेड्डी वांगासोबत 'ॲनिमल' चित्रपटात काम केले आहे. पॅन इंडिया स्पिरिट रिलीज होईल. मागील काही दिवसांपूर्वी सेटवरून पुजेचे फोटो समोर आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, 'रणबीर कपूरची एन्ट्रीने कथेत ट्विस्ट येईल. हा एक ऐतिहासिक क्षणासारखा आहे. कारण, असे पहिल्यांदा होईल, जेव्हा रणबीर आणि प्रभास स्क्रीन स्पेस शेअर करतील.

मोहनलाल दाखवणार जादू

तब्बल ४०० हून अधिक चित्रपटात काम केलेले साऊथ स्टार मोहनलालचीही चित्रपटात एन्ट्री झाली आहे. पण, त्यांची भूमिका काय असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

prabhas- sandeep reddy vanga -ranbir kapoor
Bigg Boss Marathi-6 चा धमाकेदार टीझर, रितेश देशमुख की महेश मांजरेकर, कोण करणार होस्ट?

कोरियन अभिनेताही झळकणार?

मीडिया रिपोर्टनुसार, कोरियन अभिनेता मा डोंग -सियोक खलनायकाच्या भूमिकेत असेल. तर विवेक ओबेरॉय देखील चित्रपटात दिसणार आहे. पण या दोन्ही अभिनेत्याच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

भावूक अन्‌ थ्रीलर कहाणी

प्रभासने नुकताच 'स्‍प‍िरिट'साठी आपला लूक टेस्ट पूर्ण केला आहे. २३ नोव्हेंबरपासून शूटिंग सुरू झाली आह. 'बाहुबली' स्टार एक दमदार, हाय-इम्पॅक्ट भूमिकेत असेल. ज्यामध्ये वांगा यांनी भावूक आणि ॲक्शनने भरपूर कथेचा मसाला तयार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news