

बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच कलर्स मराठी आणि JioHotstar वर सुरू होणार आहे. नवीन टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. थीम, होस्ट आणि कंटेस्टंट यादीबाबत चर्चा जोरात आहे.
Bigg Boss Marathi-6 teaser released
मुंबई - कलर्स मराठीने बिग बॉस मराठी ६ चा एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यात “काहीतरी धमाकेदार येतंय” असा संदेश आहे. थीम “हेव्हन अँड हेल”चा अंदाज असून नवीन प्रोमोमध्ये बिग बॉस मराठी ६ च्या थीममध्ये अनेक दरवाजे दाखवले गेले आहेत, म्हणजे या सिझनमध्ये नवे वळणे आणि ट्विस्ट अपेक्षित आहेत. या सीझनचा होस्ट कोण असेल, हे अद्याप स्पष्ट नाही. पण, रितेश देशमुख पुन्हा येणार, की महेश मांजरेकर होस्टिंग करणार, यावर सध्या चर्चा सुरु आहे. रिपोर्टनुसार, हिंदी ‘बिग बॉस १९’ चे ग्रँड फिनाले झाल्यानंतर लगेच मराठी सिझन ६सुरू होऊ शकतो. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असून मराठी सीझन ६ पासून मोठी अपेक्षा आहे.
थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? आणि बरंच काही...बिग बॉस मराठी सिझन सहावा घेऊन येणार आहे. तसेच यावेळेस सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार की महेश मांजरेकर येणार? भाऊचा कट्टा पुन्हा एकदा घराघरात पाहायला मिळणार का? या सर्व प्रश्नांची चर्चा होताना दिसतेय.
कलर्स मराठीकडून सादर करण्यात आलेल्या खास टीझरमध्ये प्रेक्षकांना यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला तो म्हणजे दरवाजा. या वेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत. यावेळेसचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे हे निश्चित ! दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार... बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!.
बिग बॉस ६ चे नवे टीझर रिलीज
या वर्षीच्या बिग बॉस मराठी सिझन ६ च्या टीझरमध्ये एकाच दाराऐवजी अनेक दरवाजे दिसताहेत. पण दरवाजामध्ये जे गुपित आहे, ते अद्याप सर्वांसमोर आलेले नाही. दारांमधून प्रकाश येताना दिसतोय. घराची त्याची एक वेगळी रचना दिसतेय. पण दारामागे नेमकं काय दडलंय, हा नवा प्रोमो समोर आल्यानंतर समजणार आहे.
सध्या या सिझनबद्दलची सर्वच माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आलीय. स्पर्धक कोण असेल, होस्ट कोण करणार, किती सदस्य असणार? याचा लवकरच उलगडा होणार आहे. बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच परततोय.