

सेलिना जेटली यांनी तिच्या पती पीटर हॉगवर १४ वर्षांच्या लग्नानंतर गंभीर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले आहेत. याचिकेत तिने भावनिक, शारीरिक, लैंगिक आणि मौखिक अत्याचार सहन केल्याचे म्हटले आहे. तिने ५० कोटींची भरपाई आणि महिन्याला १० लाख मेंटेनन्स मागितली आहे.
CelIna Jaitly Filed Case Against Husband
मुंबई - अभिनेत्री सेलिना जेटली विषयी एक मोठे वृत्त समोर आले आहे. तिने तिचा पती पीटर हॉगविरोधात केस दाखल केली असून घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप लावले आहेत. घरगुती हिंसाचार आणि क्रूरता यासारखे तिने आरोप लावले आहेत.
तिने मुंबईतील कोर्टात अर्ज दाखल केला असून, कोर्टाने पीटर हागला नोटीस जारी केली आहे. पुढील सुनावणी १२ डिसेंबरला ठरविण्यात आली आहे. सेलिनाच्या याचिकेनुसार, तिने भावनिक, शारीरिक, लैंगिक आणि मौखिक अत्याचार सहन केले आहेत.
पुढे अर्जात तिने आरोप केले आहेत की लग्नानंतर तिच्या कामावर बंदी घातली गेली. मुले झाल्यानंतर पतीने तिला काम करण्यापासून रोखले, ज्यामुळे तिची आर्थिक स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा कमी झाली. त्यामुळे तिने या नुकसानीसाठी १० लाख रुपये मासिक उदरनिर्वाह भत्ता आणि ५० कोटी रुपयांची मागणी केलीय.
रिपोर्टनुसार, ४४ वर्षांची अभिनेत्री सेलिना जेटलीने याचिकेत आरोप केले आहेत की, पीटर हॉगमुळे ती "सतत्याने घरगुती हिंसाचाराला बळी पडलीय."
तिने आपल्या याचिकेत म्हटलंय की, पती पीटर हॉगला मुंबईतील घरात येण्यापासून मज्जाव करण्याची विनंती केलीय. आणि तीन मुले विंस्टन, विराज आणि आर्थरचा ताबा मिळावा, अशी मागणी देखील केलीय. सध्या मुले त्याच्याजवळ ऑस्ट्रियात आहेत, आणि तिला त्यांच्याशी “अडथळ्याशिवाय व्हर्च्युअल किंवा टेलिफोनिक संपर्क मिळावा, अशी मागणी तिने केली आहे.
सेलिना जेटली-पीटर हॉगचे लग्न
सेलिना जेटली - पीटर हॉगचे २०११ मध्ये लग्न झाले होते. २०१२ मध्ये तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. २०१७ मध्ये देखील जुळ्या मुलांना जन्म दिला होता. पण, जन्मजात हृदय रोग असल्याकारणाने एका बाळाचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, दुसरीकडे सेलिनाचा भाऊ, रिटायर्ड मेजर विक्रांत कुमार जेटली विदेशातील तुरुंगात आहे. १ वर्षाहून अधिक कालावधी झाला असून सेलिनाने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपल्या बावना व्य्क्त केल्या होत्या आणि सांगितले होते की, कशाप्रकारे भाऊ अडचणीत सापडला आहे. त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी तिने सरकारकडे विनंती देखील केली होती.
सेलिनाचा भाऊ MATITI ग्रुपसी संबंधित होता. ती कन्सल्टेंसी, ट्रेडिंग आणि रिस्क मॅनेजमेंटसी संबंधित एक कंपनी आहे. सेलिनाने आरोप केला आहे की, सप्टेंबर, २०२४ मध्ये कोणतीही कल्पना नसताना भावाला मॉलमधून अटक करण्यात आली. विदेश मंत्रालय तिच्या कुटुंबाला, त्याची परिस्थिती, लीगल स्टेटस विषयी कोणतीही माहिती देत नाहीये. अभिनेत्रीने तशी याचिका कोर्टात दाखल केली होती. यावर कारवाई करत दिल्लीतील कोर्टोने अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले की, भावाशी आणि तिचा संपर्क घडवून आणण्यासाठी तसेच भावाच्या पत्नीशी बातचीतची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
तिने इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं होतं की, 'मेजर विक्रांत जेटलीने आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेत घालवली आहेत आणि अनेकदा ड्यूटीवेळी जखमी देखील झाला आहे. आता भारत विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर आहे आणि परदेशात आमचे सेवानिवृत्त सैनिक निशाणा बनत आहेत.'