Spiderman Lizard | ‘स्पायडरमॅन’सारखा दिसणारा जगातील एकमेव सरडा पाहिला आहे का?

Namdev Gharal

Mwanza Flat-headed Rock Agama या सरड्याला त्याच्या विशिष्ट रंगामुळे जगभरात 'स्पायडरमॅन लिझार्ड' (Spiderman Lizard) याच नावाने ओळखलं जातं.

या सरड्याचे डोके, मान आणि खांदे गडद लाल किंवा गुलाबी रंगाचे असतात, तर उर्वरित शरीर आणि पाय गडद निळ्या रंगाचे असतात. हा रंगसंगतीचा मिलाफ हुबेहूब मार्वलच्या 'स्पायडरमॅन' सारखा दिसतो.

हा सरडा पूर्व आफ्रिकेतील सर्वात आकर्षक दिसणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे, हा मुख्यत्‍वे टांझानिया, केनिया आणि रवांडा येथील खडकाळ प्रदेशात आढळतो.

याचे वैशिष्ट्ये म्हणजे हे आकर्षक रंग फक्त नर सरड्यांमध्येच पाहायला मिळतात. मादी सरडा प्रामुख्याने तपकिरी किंवा राखाडी रंगाची असते, ज्यामुळे तिला खडकांमध्ये लपून राहणे सोपे जाते.

जेव्हा हा सरडा घाबरतो किंवा रात्रीच्या वेळी विश्रांती घेतो, तेव्हा त्याचा हा तेजस्वी रंग फिका पडतो आणि तो काळपट किंवा तपकिरी दिसू लागतो. उत्साही असताना किंवा ऊन खाताना त्याचे रंग पुन्हा गडद होतात.

हा प्रामुख्याने उष्ण भागात आढळतो. ते विशेषतः सपाट खडकांवर राहायला यांना आवडते, याचे खाद्य म्हणजे टोळ, किडे आणि मुंग्या.

हे सरडे खूप लाजाळू असतात आणि माणसांची चाहूल लागताच खडकांच्या फटीत शिरतात.त्यांच्या रंगांमुळे परदेशात अनेक लोक त्यांना पाळीव प्राणी म्हणूनही पाळतात.

सर्वात तेजस्वी रंगाचे नर सहसा उत्तम सूर्यप्रकाश असलेल्या खडकांवर आपले नियंत्रण ठेवतात, जिथे ते ऊन शेकतात, आपल्या प्रदेशाचे रक्षण करतात आणि मादीला आकर्षित करतात.

यांचा विकास खडकाळ पृष्ठभागावर राहण्यासाठी झाला आहे, चपटे शरीर त्‍यांना जमीनीजवळ राहण्यास मदत करतात, वेगाने धावता पण येते यामुळे शिकाऱ्यापासून वाचता येते.