

Son of Sardaar 2 Trailer out now
मुंबई - अजय देवगनचा चित्रपट 'सन ऑफ सरदार २' चा दुसरा ट्रेलर रिलीज झाला असून यामध्ये संजय दत्तच्या जागी रवि किशन दिसत आहे. हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. विजय कुमार यांचे दिग्दर्शन असून अजय देवगनसोबत मुख्य भूमिकेत मृणाल ठाकूर ही अभिनेत्री आहे.
या चित्रपटाचा पहिला भाग २०१२ मध्ये रिलीज झाला होता. यावेळी संजय दत्त दिसला नाहीय त्याच्या जागी रवि किशनला रिप्लेस करण्यात आले असून त्यांचा नवा अंदाज यामध्ये पाहायला मिळत आहे. सन ऑफ सरदार २ चा पहिला ट्रेलर १४ जुलैला जारी करण्यात आला आहे, यामध्ये अजय देवगन, रवि किशन, विधु विनोद चोप्रा, संजय मिश्रा पासून मृणाल ठाकुर, कुब्रा सैत पर्यंत स्टार्स दिसणार आहेत. २०१२ मध्ये रिलीज झालेला सन ऑफ सरदार सुपरहिट ठरला होता. आता पुन्हा अजय देवगन जस्सीचा अंदाज घेऊन येत आहे. चित्रपटातील गाणीही चांगली असल्याचे म्हटले जात आहे. पहिल्या गाण्याती हुक स्टेप खूप व्हायरल झाली होती.
ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा सरदार जस्सीची कहाणी दिसते. जिथे त्याच्या येणाऱ्या नवनव्या समस्यांवर प्रेक्षक हसताना दिसतात. जस्सीच्या अडचणीदेखील कमी नाहीत. पण याच अडचणींना निर्मात्यांनी कॉमेडीचा तडका लावलाय.
सन ऑफ सरदार २चा ट्रेलर हे दर्शवते की, एक सरदार कितीही अडचणीत असो पण जेव्हा तो हिंमतीने उभा राहतो, तेव्हा र्सांवर भारी पडतो. दीपक डोबरियाल याची मजेशीर भूमिका आहे. तो एका महिलेच्या भूमिकेत आहे. ट्रेलर पाहून फॅन्स कयास लावत आहेत की, हा चित्रपट सुपरहिट होईल. दुसरीकडे, रवि किशनचा सरदार लुक देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
अजय देवगन, रवि किशन, मृणाल ठाकुर सोबत संजय मिश्रा, नीरू बाजवा, चंकी पांडे, विंदू दारा सिंह, कुब्रा सैत, दीपक डोबरियाल, रोशनी वालिया, शरत सक्सेना, साहिल मेहता यासारखे दमदार कलाकार आहेत.