

Avatar 3 Poster out
मुंबई - हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमरूनच्या अवतार या चित्रपटाचा तिसरा भाग येतोय. अवतार-फायर अँड एश लवकरच रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर जारी केले आहे. ज्यामध्ये नवा खलनायक वरांग दाखवण्यात येईल. त्याआधी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
जेम्स कॅमरूनच्या 'अवतार' चित्रपटाची क्रेज जगभरात आहे. जगातील वर्ल्ड हाएस्ट ग्रॉसिंग चित्रपटापैकी एक आहे. पहिला भाग २००९ मध्ये रिलीज झाला होता. दुसरा भाग अवतार: अवतार द वे ऑफ वॉटर २०२२ मध्ये रिलीज झाला होता. जगभरात २.३२ बिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा अधिक कमाई केलीय.
दोन्ही भागांच्या यशानंतर निर्माते तिसरा भाग आणत आहेत-टायटल आहे अवतार : फायर अँड एश. यावर्षीच हा चित्रपट पडद्यावर येईल.
जेम्स कॅमरून यांनी तिसऱ्या भागाचे अधिकृत पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत नवा विलेन 'वरांग'ला इंट्रोड्यूस केलं आहे. पोस्टरमध्ये विलेनचा चेहरा अस्पष्ट दिसत आहे. त्याच्या मागे आग दिसत आहे. सोबतच फॅन्ससाठी एक्सक्लुझिव्ह चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्याची घोषणा केली आहे.
हे पोस्टर शेअर करत इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिलंय, "अवतार : फायर अँड एशमध्ये वरांगशी भेटा. तुम्ही त्या लोकांमध्ये सहभागी व्हा, जो या वीकेंडवर द फँटेस्टिक ४ : फर्स्ट स्टेप्स सोबत अवतार ३ चा ट्रेलर.
अवतारचा तिसरा भाग १९ डिसेंबर, २०२५ रोजी ख्रिसमसच्या निमित्ताने वर्ल्डवाईड रिलीज होणार आहे.
अवतार चित्रपटातील जी पर्वतराजी दाखवण्यात आली आहे, ते अनोखे पर्वत चीनमध्ये आहेत. एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ते नावारुपास आले आहे. चीनचे पहिले राष्ट्रीय उद्यान झांगजियाजी येथे काचेच्या तळाचे पूल, माउंटन लिफ्ट आणि कॉफी पित पर्वतराजींचे अद्भूत दृश्य येथे आहे.
हुनान प्रांताच्या वायव्य कोपऱ्यात वसलेले, झांगजियाजी हे चीनचे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. ९८२ मध्ये ते स्थापन झाले आहे. हे जंगल मोठ्या वुलिंगयुआन सीनिक एरियाचा एक भाग आहे. त्यास १९९२ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले होते. नंतर २००१ मध्ये ग्लोबल जिओपार्कचा दर्जा दिला होता. ब्लॉकबस्टर चित्रपट अवतारमध्ये दाखवलेल्या हल्लेलुजे पर्वत जे दिसतात, ते याच जंगलातील पर्वराजींपासून प्रेरणा घेऊन शूटसाठी वापरण्यात आले होते. या जंगलात तब्बल ३ हजार अनोखे पर्वत पाहायला मिळतात, असे म्हटले जाते. प्रत्येक पर्वतावर वेगळी जैवविविधता असल्याचे म्हटले जाते. ही पर्वतराजी पाहण्यासाठी बसमधून जावे लागते आणि लिफ्ट्समधून पर्यटकांना दाखवण्यासाठी नेले जाते.