Rinku Rajguru | सैराट झालं जी! पहिलं ते पहिलच असतं; 'आर्ची'चा जबरदस्त डान्स, व्हिडिओ पहा

Rinku Rajguru | सैराट झालं जी! पहिलं ते पहिलच असतं; 'आर्ची'चा जबरदस्त डान्स, व्हिडिओ पहा
image of Rinku Rajguru
Rinku Rajguru new dance video viral Instagram
Published on
Updated on

Rinku Rajguru dance on sairat jhal ji video viral

मुंबई - 'सैराट'ची आर्ची पुन्हा एकदा चर्चेत आलीय. रिंकू राजगुरूचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला असून 'सैराट' चित्रपटातील सैराट झालं जी या गाण्यावर ती थिरकताना दिसतेय. रिंकूने याच चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत डेब्यू केला होता. या भूमिकेतूनच ती घराघरात पोहोचली. 'आर्ची' या तिच्या व्यक्तिरेखेमुळे आणि चित्रपटातील गाण्यांमुळे आर्चीची क्रेझ अद्यापही टिकून आहे. आता तिच्या एका डान्स व्हिडिओमुळे रिंकू पुन्हा चर्चेत आलीय.

सोशल मीडियावर सध्या रिंकू राजगुरूचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू डान्सची प्रॅक्टिस करताना दिसते. तिने डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. कॅप्शन लिहिलीय- 'पहिलं ते पहिलंच असतं'. सोबतच तिने #firstisalwaysspecial असा हॅशटॅगही दिलेला आहे.

चाहत्यांचा व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

रिंकूचा हा डान्स पाहून अनेकांना तिच्या 'सैराट'मधील आर्चीची आठवण आली आहे. चाहत्यांनी भरभरून कॉमेंट्सचा पाऊस पाडलाय. चाहते म्हणाले, ''आकाश ठोसर बरोबर हा डान्स बघायला खूप छान वाटलं असतं आठवण २०१६ ची, पहिले ते पहिले असते का माहित ते काय असते जे असत ते नेमक काय असत, सैराटचा पार्ट २ देखील बनवा, तू खूप सुंदर आहे रिंकू, एकदम झकास रिंकू..''

image of Rinku Rajguru
Sachin Pilgaonkar | जेव्हा ऑटोग्राफ घेण्यासाठी संजीव कुमार पोहोचले होते सचिन पिळगावकरांच्या घरी, वाचा किस्सा

सैराट चित्रपटाबद्दल थोडेसे

सैराट हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट होय. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आटपट प्रॉडक्शन बॅनरखाली दिग्दर्शित आणि सह-निर्मित केला होता. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका होत्या. नागराज मंजुळे यांनी फॅन्ड्री (२०१३) बनवल्यानंतर सैराटची पटकथा लिहिली. संवाद त्यांचे भाऊ भरत यांनी लिहिले होते. हा चित्रपट महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या मंजुळेंच्या गावात चित्रित करण्यात आला होता.

image of Rinku Rajguru
Yere Yere Paisa-3 Review | पैशाची पचनी न पडणारी गोष्ट... येरे येरे पैसा -3

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news