

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा दंबग खान सलमानची तथाकथित गर्लफेंड 'सोमी अली' पुन्हा एकदा एका खळबळजनक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने 'इंस्टाग्राम' च्या माध्यमातून एक पोस्ट लिहित एका प्रसिद्ध अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'तू मुलींना मारहाण करतोस'. 'तुझ्या मुलामुळे एका नवोदित अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे', असाही गंभीर आरोप तिने इन्स्ट्राद्वारे केला आहे. पोस्ट केल्यानंतर काही वेळाने तिने ती पोस्ट डिलिक्ट केली असली तरी ती प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळे ती मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोमी अली आणि सुपरस्टार सलमान खान हे दोघे १९९१ ते १९९९ दरम्यान रिलेशनशीप मध्ये होते. १९९९ मध्ये त्या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम करत बालकांना मदत करणारी संस्था सुरू केली. नो मोअर टीयर्स (No More tears) या संस्थेच्या माध्यमातून तिचे अजूनही काम सुरू आहे. सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर तिने सलमानवरही सोशल मीडियाद्वारे अनेक गंभीर आरोप केले होते. आता तिने प्रसिद्ध अभिनेता आदित्य पंचोली याच्यावर महिलांना फसविण्याचा व त्यांना मारहाण करण्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरच ती थांबली नाही तर नवोदित अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूला आदित्य पंचोली याच्या मुलाला जबाबदार धरले आहे.
अदित्य पंचोली 'तू महिलांना फसवतोस, त्यांना मारहाण करतोस', जिया खान हिच्या मृत्यूला तुझा मुलगा जबाबदार आहे. तु एक नीच व्यक्ती असून तुझ्या मुलाला तुझ्यासारखेच वागायला शिकवत आहेस. तु कसा जगतोस याचंच आश्चर्य वाटतयं अशी तिने इस्ट्राग्रामवर पोस्ट केली असून नंतर तिने ती डिलेक्ट केली आहे.