Battle of Galwan | सलमान खानने जवानाच्या भूमिकेसाठी सोडली दारू; एसी आणि कार्ब्सपासूनही दूर

Battle of Galwan: Salman Khan | सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान'साठी तयार? BTS व्हिडिओमुळे चर्चेला उधाण!
image of battle of galwan movie
Battle of Galwan Salman Khan exercise and diet Instagram
Published on
Updated on

मुंबई - बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने आणि अॅक्शनने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतो. चाहते नेहमीच त्याच्या पुढच्या प्रोजेक्टबाबत उत्सुक असतात, आणि सध्या सलमान खान आपली आगामी देशभक्तीपूर्ण वॉर फिल्म ‘बॅटल ऑफ गलवान’साठी तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत. ही फिल्म 2020 मध्ये भारत-चीनदरम्यान लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या वास्तविक संघर्षावर आधारित आहे.

गलवानच्या लढाईसाठी सलमान खान जबरदस्त शारीरिक बदल करत आहे, त्याचा फिटनेस पाहून कौतुक होत आहे. भारत-चीन संघर्षावर आधारित या चित्रपटामध्ये त्याचं नवं रूप आणि अशी एक भूमिका दाखवण्यात आली, जी आधी तुम्ही कधीच पाहिली नसेल.

सलमानने केवळ नियमितपणे व्यायाम करणे सुरू केलं आहे. त्याने आपल्या आहारातही बदल केला आहे. रिपोर्टनुसार, आहार पूर्णपणे घरातूनच तयार करून आणले जाते. ज्यामध्ये भाज्या - प्रोटीन असतात. सूत्रांच्या माहितीनुसार, "रोज केवळ एक चमचा भात." सर्व कार्बोहायड्रेट्स सोडले असून दारूही सोडलीय.

'बॅटल ऑफ गलवान'मध्ये हे असतील कलाकार

चित्रपटात मुख्य भूमिकेत सलमान खान - चित्रांगदा सिंह आहेत. शिवाय अंकुर भाटिया, जेन शॉ, अभिलाष चौधरी, विपिन भारद्वाज, हर्षिल शाह, हीरा सोहल देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली सुरु असलेल्या चित्रपटाचे शूटिंग लडाखमध्ये असेल. सलमान ऑगस्टपासून शूट करेल.

सलमान खानने या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यामधील त्याचा धडाकेबाज लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली. दरम्यान, अपूर्व लाखिया यांनी नुकताच एक बिहाइंड-द-सीन (BTS) व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, यामुळे 'बॅटल ऑफ गलवान'मधील सलमान खानच्या भूमिकेची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.

image of battle of galwan movie
YRF Saiyaara Trailer | प्रेमाची अनोखी कहाणी; अहान पांडे-अनीत पड्डाचा रोमँटिक सैयाराचा ट्रेलर रिलीज

या लघु व्हिडिओ क्लिपमध्ये एक धुसर छायाचित्र दिसते, त्यात सलमान खान प्रॅक्टीस करताना दिसतो. व्हिडिओमध्ये अ‍ॅक्शन कोरिओग्राफीची जोरदार रिहर्सल सुरू असल्याचे पाहायला मिळते. जरी सलमान खानचे नाव किंवा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही, तरी चाहत्यांनी अंदाज बांधला आहे की हे दृश्य 'बॅटल ऑफ गलवान'साठीच आहे.

व्हिडिओसोबत अपूर्व लाखियाने एक प्रेरणादायी कॅप्शन लिहिले आहे: "practise makes perfect No pain no gain...#practisemakesperfect #action #battleofgalwan #salmankhan"

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून, त्यावरून अंदाज लावला जात आहे की सलमान खान आता एका वेगळ्या आणि गभीर भूमिकेत झळकणार आहेत.

image of battle of galwan movie
Priyanka Pandit | एक MMS आणि करिअर उद्ध्वस्त; 'या' भोजपुरी अभिनेत्रीने ग्लॅमर वर्ल्ड सोडून धरली वृंदावनाची वाट

'बॅटल ऑफ गलवान' १५ जून, २०२० रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या झटापटीवर आधारित आहे. या संघर्षात दोन्ही देशांचे जवान शहीद झाले होते. विशेष म्हणजे, या संघर्षात बंदुकींचा वापर झालेला नव्हता, कारण त्या भागात शस्त्रास्त्र वापरण्यावर बंदी होती. यामध्ये लाठ्या-काठ्या आणि दगडांचा वापर करत शौर्यपूर्ण लढाई झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news