Somy Ali | सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड 'सोमी अली'ला भेटायचंय गँगस्टर बिश्नोईला!

'नमस्ते, लॉरेन्स भाई'! म्हणत केला थेट मेसेज, फोन नंबर मागितला
Somy Ali
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय.(file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि त्यानंतर अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे लॉरेन्स बिश्नोई गँग (gangster Lawrence Bishnoi) सध्या चर्चेत आहे. याच दरम्यान, आता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली (Somy Ali) देखील चर्चेत आली आहे. कारण तिने नुकतेच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला झूम कॉलद्वारे चॅटसाठी आमंत्रित केले होते. सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात असलेल्या बिश्नोई याच्याशी संवाद साधण्यासाठी सोमी अलीने सोशल मीडियाचा वापर केला आहे.

सोमी अली आणि सलमान खान १९९० च्या दशकात एकमेकाच्या प्रेमात होते. पण आता बिश्नोई गँगकडून सलमान खानला मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सोमी अलीने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी सोमी अलीने इंस्टाग्रामवर लॉरेन्स बिश्नोई याला केलेला थेट मेसेज शेअर केलाय.

Somy Ali : सोमी अलीने नेमकं काय म्हटलंय?

सोमी अलीने तिच्या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून झूम कॉल कसा व्यवस्थापित केला याबद्दल सांगितले आहे. तिने त्याच्याशी संवाद साधण्याची विनंती केली. तिने पुढे लिहिले आहे की, “हा लॉरेन्स बिश्नोईला थेट मेसेज आहे : नमस्ते, लॉरेन्स भाई, मी असे ऐकले आणि पाहिले आहे की तुम्ही जेलमधूनही झूम कॉल करतात, म्हणून मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. कृपया करुन मला सांगा हे कसे शक्य आहे?. संपूर्ण जगात सर्वात आवडते ठिकाण म्हणजे राजस्थान होय. आम्हाला तुमच्या मंदिरात पूजा करण्यासाठी यायचे आहे, पण त्याआधी तुमच्याशी झूम कॉलवर बोलू. मग माझ्यावर विश्वास ठेवा की, या गोष्टी तुमच्या फायद्यासाठी आहेत. मला तुमचा मोबाईल नंबर द्या, तुमचे खूप उपकार होतील. धन्यवाद.''

बाबा सिद्दीकी यांची हत्या अन्‌ आता सलमान खानला धमकी

बाबा सिद्दिकी (Baba Siddique murder) यांची वांद्र्यात खेरवाडी सिग्नलवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी ते लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा केला. दरम्यान, सलमान खान देखील बिश्नोई गँगच्या टार्गेटवर आहे. यामुळे सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. याचदरम्यान, मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला अभिनेता सलमान खानसाठी एक धमकीचा मेसेज आला आहे. मेसेज पाठवणाऱ्याने स्‍वत:ला लॉरेन्स बिश्नोई गँगमधील असल्‍याचे म्‍हटले आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगसोबतचा वाद मिटवायचा असेल तर ५ कोटी रूपये द्यावेत, अन्यथा सलमान खानची अवस्‍था बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट करण्याची धमकी देण्यात आली आहे.

Somy Ali
Salman Khan : लॉरेन्स बिश्नोई टाेळीतील एकाची सलमान खानला धमकी; ५ कोटी दे अन्यथा...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news