

Singer Gayatri Hazarika passed away due to cancer
नवी दिल्ली : आसामच्या प्रसिद्ध गायिका गायत्री हजारिका यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्या कोलन कॅन्सरशी झुंजत होत्या. गुवाहाटीतील नेमकेयर रुग्णालयात दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी सांगितले की, गायत्री हजारिका कॅन्सरवरील उपचार याच रुग्णालयात करत होत्या. पण, त्यांची प्रकृती अधिक बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गायत्री हजारिका मागील तीन दिवसांपासून रुग्णालयात होत्या. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. हजारिका यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात दु:ख व्यक्त केले जात आहे. आता सोशल मीडियावर लोक श्रद्धांजली वाहत आहेत.
केवळ सेलेब्सच नाही तर अनेक नेते गायत्री हजारिका यांना श्रद्धांजली वाहत आहेत. गायत्री हजारिका त्यांच्या सुरेल आवाजासाठी ओळखल्या जायच्या. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एक्स अकाऊंटवर फोटो पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.