Ramayana : रणबीर कपूरच्या रामायणात मंदोदरीची भूमिका साकारणार 'ही' दाक्षिणात्‍य सुंदरी, लंकापतीसाेबत शूटिंग केले सुरू...

या चित्रपटात अनेक बॉलिवूड आणि दक्षिणेतले दिग्‍गज कलाकार असल्‍याने प्रेक्षकांची उत्‍सुकता वाढली आहे.
Ramayana Film
Ramayana : रणबीर कपूरच्या रामायणात मंदोदरीची भूमिका साकारणार 'ही' दाक्षिणात्‍य सुंदरी, लंकापतीसाेबत शूटिंग केले सुरू....File Photo
Published on
Updated on

bollywood this south actress to play mandodari role in ranbir kapoor ramayana movie

पुढारी ऑनलाईन :

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली 'रामायण' हा पौराणिक चित्रपट बनवला जात आहे. रणबीर कपूर स्‍टारर या चित्रपटात बॉलिवूडपासून दक्षिणेतल्‍या चित्रपटातील अनेक दिग्‍गज कलाकार या चित्रपटात दिसून येणार आहेत. आता या चित्रपटात एका सुंदरीची एंट्री झाली आहे पाहूयात कोण आहे ती सुंदरी...

Ramayana Film
Kalki Koechlin | 'इथे 1BHK मध्ये राहून ऑडीमध्ये फिरतात', कल्किने उघड केला बॉलीवूड सेलेब्सचा खरा चेहरा!

ही अभिनेत्री दक्षिणेतली प्रसिद्ध अदाकारा आहे. तीने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. ती रामायण सिनेमात मंदोदरीची भूमिका साकारणार आहे. मंदोदरी ही रावणाची पत्‍नी आहे. एका बॉलिवूड सुपरस्‍टारच्या सिनेमातही दिसून आली होती.

'ही' सुंदरी रामायणात होणार मंदोदरी

तुम्‍हला अजुनही लक्षात आले नसेल तर, या चित्रपटात काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ही काम करणार आहे. सिकंदर मध्ये दिसलेल्‍या काजलला नितेश तिवारीने रामायणमध्ये मंदोदरीची भूमिकेसाठी घेतले आहे. तीचा लूक टेस्‍टही पूर्ण झाला आहे.

Ramayana Film
Usha Nadkarni | 'डोक्यात मुंग्या यायच्या'.. उषा नाडकर्णींना कोणत्या शोमधून बाहेर पडल्यावर असं वाटत होतं?

काजलचा लूक टेस्‍ट झाला पूर्ण...

काजल अग्रवालने गेल्‍या आठवड्यातच आपला लुक टेस्‍ट दिला होता. ती मंदोदरीच्या भूमिकेत एकदम फिट बसत असल्‍याचे बालले जात आहे. इतकच नाही तर तीने आता चित्रपटाच्या चित्रिकरणालाही सुरूवात केली आहे. निर्मात्‍यांकडून सध्या रावणाच्या लंकेचे चित्रिकरण सुरू आहे. याआधी काजलला सलमान खानच्या सिकंदर चित्रपटात पाहण्यात आले होते.

रामायण केंव्हा होणार रिलीज...

या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत, तर निर्मिती नमित मल्होत्रा ​​करत आहेत. यश या चित्रपटाचा सह-निर्माता देखील आहे. भगवान रामाची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे आणि सीतेची भूमिका साई पल्लवी साकारत आहे. तर, सनी देओल भगवान हनुमानाच्या भूमिकेत आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Ramayana Film
Kangana Ranaut: केंद्रीय मंत्र्याचा फोन आला अन्‌ कंगनाने हटवली 'ती' पोस्ट; पंतप्रधान मोदींचे केले होते कौतूक

रामायण दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग दिवाळी २०२६ ला प्रदर्शित होईल आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ ला थिएटरमध्ये दाखल होईल. वृत्तानुसार, पहिल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या भागाचे चित्रीकरण सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news