सिद्धार्थ आनंद सैफ अली खान सोबत घेऊन येतोय ‘ज्वेल थीफ- द रेड सन चॅप्टर’

saif ali khan
saif ali khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माता सिद्धार्थ आनंद यांच्या सोशल मीडिया पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिग्दर्शक-निर्मात्याने सैफ अली खानसोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि तेव्हापासून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. पण आता बातमी पक्की आहे- सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान हे दोघं आगामी चित्रपटासाठी सोबत येत आहेत.

अधिक वाचा –

सिद्धार्थ आनंदने कॅप्शनमध्ये लिहिले होते, "माझ्या पहिल्या हिरोसोबत सेटवर परत येत आहे." सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान तब्बल १७ वर्षांनंतर एकमेकांसोबत काम करणार असून चाहत्यांना आगामी चित्रपटाची उत्सुकता आहे. सिद्धार्थने रॉबी ग्रेवाल आणि सैफचा एक फोटो शेअर करून या तिघांच्या नव्या चित्रपटाचं नाव ठरवलं आहे. बहुप्रतीक्षित चित्रपटाचं नाव "ज्वेल थीफ- द रेड सन चॅप्टर" असे असणार आहे, असं सिद्धार्थ आनंद यांनी सांगितल आहे.

अधिक वाचा –

निर्मात्या ममता आनंदसोबत सिद्धार्थ 'मार्फ्लिक्स पिक्चर्स' अंतर्गत या प्रकल्पाची निर्मिती करत आहे तर रॉबी ग्रेवाल याचे दिग्दर्शन करत आहेत. या प्रोजेक्टमध्ये जयदीप अहलावत देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अधिक वाचा –

सिद्धार्थ आनंद, ममता आनंद, सैफ अली खान आणि रॉबी ग्रेवाल यांच्यासह उर्वरित कलाकार आणि क्रू सध्या बुडापेस्टमध्ये या प्रोजेक्टसाठी शूटिंग करत आहेत. सिद्धार्थ यांनी यापूर्वी 'सलाम नमस्ते' आणि 'ता रा रम पम' साठी एकत्र काम केले आहे. आता, हे त्रिकूट पडद्यावर काय आणणार आहे हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Anand (@s1danand)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news