

Shubman Gill Avneet Kaur Sara Ali khan and Sara Tendulkar
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली असून, युवा फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill) याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. शुभमन गिल हा आजच्या काळातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो सारा तेंडुलकर, सारा अली खान आणि अवनीत कौर यांच्याशी असलेल्या तथाकथित संबंधांमुळेही चर्चेत होता. कधी त्याचं नाव सारा अली खान तर कधी अवनीत कौरशी जोडलं गेलं तर कधी सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरशी रिलेशनशीपमध्ये असल्याच्या वृत्तांना उधाण आले होते. याबाबत शुभमनने स्पष्टीकरण देत नेमकं काय म्हटलं होतं पाहुया? द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपण सिंगल की मिंगल याबद्दल स्पष्टचं सांगितलं होतं.
गेल्या काही वर्षांपासून, शुभमन बॉलिवूड अभिनेत्रींसोबतच्या अफेअर्समुळे चर्चेत आहे. त्याचे नाव सारा तेंडुलकरशी जोडले गेले आहे. तर कधी सारा अली खान आणि अवनीत कौरशी देखील जोडले गेले आहे. द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, शुभमनने स्पष्ट केले होते की, तो गेल्या ३ वर्षांहून अधिक काळ सिंगल आहे. तो म्हणाला होता की, "माझं नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींशी जोडण्याच्या अनेक अफवा पसरल्या आहेत. कधीकधी, मला हे इतके हास्यास्पद वाटते की, मी माझ्या आयुष्यात कधीही त्या व्यक्तीला पाहिले नाही किंवा भेटलेलो नाही आणि त्या व्यक्तीसोबत माझे नाव जोडले जाते. सध्या, मी माझ्या करिअर लक्ष केंद्रीत केले आहे. माझ्या आयुष्यात कोणासोबत राहण्यासाठी जागा नाहीये. तीनशे दिवस, आम्ही रस्त्यावर आहोत, प्रवास करत आहोत. त्यामुळे कोणाशीही नातेसंबंध जोडण्यासाठी वेळच नाही."
इतकेच नाही तर करण जोहरच्या कॉफी विथ करण - ८ मध्ये सारा अली खान ला शुभमन गिलसोबतच्या लिंकअप बद्दल विचारण्यात आले होते. त्यानंतर शुभमन फलंदाजी करत असताना स्टेडियममधील प्रेक्षकांनी "सारा! सारा!" असे ओरडणे सुरु केले होते. त्यावरही सारा खानने प्रतिक्रिया दिली होती. यावर शुभमन म्हणाला होता की, "आपने ग़लत सारा को पकड़ लिया है, दोस्तों! सारा का सारा दुनिया ग़लत सारा के पीछे पड़ी है.''
सोनम बाजवाच्या पंजाबी चॅट शो 'दिल दियाँ गल्लान' मध्ये शुभमनला विचारण्यात आले होते की, तो खरोखरच साराला डेट करतो आहे का? तो म्हणाला, "कदाचित." जेव्हा सोनमने त्याला म्हटले की, "सारा का सारा सच बोलो". तेव्हा शुभमनने सांगितले- "सारा दा सारा सच बोल दिया" कदाचित, कदाचित नाही." जेव्हा त्याला बॉलिवूडमधील सर्वात फिट ॲक्टर कोण आहे असे विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले होते, "सारा."
अनेक सामन्यांमध्ये साराला शुभमनसाठी चीयर करताना पाहण्यात आलं होतं. तर शुभमनच्या दुबईतील एका सामन्यात अवनीत कौर दिसली होती. तेव्हा पासून चर्चेला सुरुवात झाली की, अवनीत आणि शुभमन रिलेशनशीपमध्ये आहेत. पण, या केवळ अफवाच असल्याचे उत्तर शुभमनने आधीच दिले आहे.