

Salman Khan host Bigg Boss 19 season increased period
मुंबई : हिंदी रिॲलिटी शो बिग बॉसचा १९ वा सीझन यावेळी हटके होणार असून त्याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. हा शो जुलैमध्ये सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण ग्रँड फिनाले जानेवारीमध्ये होणार आहे. आता हा सीझन तब्बल साडे पाच महिने सुरु राहणार असल्याची माहिती समोर आलीय.
या शोचा प्रोमो लवकरच शूट होईल, असे वृत्त समोर आले होते आणि या शोचा प्रीमियर जुलैमध्ये होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस’ मेकर्स येणाऱ्या सीजनसाठी एक मोठं ट्विस्ट घेऊन येणार आहेत. ‘बिग बॉस १९’ जवळपास साडे पाच महिने सुरु राहणार आहे. सलमान खान होस्ट करणार असून स्पर्धक म्हणून नवे चेहरे दिसणार आहेत. शोचे प्रीमियर ३० जुलै, २०२५ रोजी होईल आणि जानेवारी २०२६ पर्यंत ऑन एअर असेल. सलमान खान जून २०२५ चा ‘बिग बॉस १९’ प्रोमो शूट करेल.
यावेळी पहिल्यांदा Bigg Boss OTT शो होणार नाही. याआधी शोचा शॉर्ट सीझन डिजिटल व्हर्जन दिड महिन्यांपर्यंत जिओ सिनेमावर स्ट्रीम करण्यात आलं होतं. असं म्हटलं जात आहे की, कलर्स टीव्ही नव्या निर्मात्याच्या शोधात आहेत.