Bhool Chuk Maaf vs Kesari Veer | 'भूल चूक माफ'ने ओपनिंग डे ला केली इतकी कमाई, 'केसरी वीर'ची निराशाजनक सुरुवात

Bhool Chuk Maaf vs Kesari Veer BO Collection |'भूल चूक माफ'ने ओपनिंग डे ला केली इतकी कमाई, 'केसरी वीर'ची कासव गतीने सुरुवात
image of Kesari Veer and Bhool Chuk Maaf film poster
Bhool Chuk Maaf vs Kesari Veer first day Box Office Collection Instagram
Published on
Updated on

Bhool Chuk Maaf vs Kesari Veer first day Box Office Collection

मुंबई - राजकुमार-वामिका गब्बी या मसाला चित्रपटाची सुरुवात साधारण झाली. तर 'केसरी वीर' एक ऐतिहासिक चित्रपट असून त्यास संमिश्र रिव्ह्यू मिळाले आहेत. दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर सुरुवात कशी झाली पाहुया. २४ मे रोजी बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव - वामिका गब्बीचा 'भूल चूक माफ' रिलीज झाला तर दुसरीकडे सुनील शेट्टी आणि सूरज पंचोलीचा 'केसरी वीर' देखील पडद्यावर आला. त्याशिवाय, तुषार कपूर आणि श्रेयस तळपडे स्टारर 'कंपकंपी' देखील रिलीज झाला.

image of Kesari Veer and Bhool Chuk Maaf film poster
Manoj Bajpayee | विपुल शाह-चिन्मय मांडलेकरच्या चित्रपटात मनोज बाजपेयी, ‘गव्हर्नर’च्या राजकारणाची चर्चा

'केसरी वीर' वीरची सुरुवात थोडी निराशाजनक झालीय. १४ व्या शतकातील सोमनाथ मंदिरावर झालेला हल्ला आणि मंदिराचे संरक्षण करणाऱ्या वीर योद्धांची कहाणी यामध्ये दाखवण्यात आलीय. या दोन्ही चित्रपटांना संमिश्र रिव्ह्यूज मिळत आहेत.

भूल चूक माफची साधारण सुरुवात

'भूल चूक माफ' ९ मे रोजी रिलीज होणार होता. पण, भारत-पाकिस्तान तणवामुळे निर्मात्यांनी थेट ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. कायदेशीर बाबीत अडकल्यानंतर, अखेर २३ मे रोजी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाली. 'भूल चूक माफ' ५० कोटी बजेटमध्ये बनला आहे. रिपोर्टनुसार, 'भूल चूक माफ' ने पहिल्या दिवशी ६.७५ कोटींचे कलेक्शन केलं आहे.

image of Kesari Veer and Bhool Chuk Maaf film poster
Nukkad Serial | 'नुक्कड'ची मारिया आठवते का? दूरदर्शनवरील 'टीचर जी' सध्या काय करते?

सुनील शेट्टी-सूरज पंचोलीच्या केसरी वीरची कासव गतीने सुरुवात

‘केसरी वीर’मधून सूरज पंचोलीने बॉलीवूडमध्ये वापसी केली. चित्रपटामध्ये सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने २५ लाख रुपये कमावले. बजेट ६० कोटींचे सांगितले जात आहे.

कंपकपी कमाल दाखवू शकला नाही

तुषार कपूर आणि श्रेयस तळपदेची 'कंपकंपी' पहिल्या दिवशी कमाल दाखवू शकली नाही. रिपोर्ट्स नुसार, केवळ २६ लाकांची कमाई करून चित्रपटाने खातं उघडलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news